IMPIMP

Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी

by sachinsitapure
Tamhini Ghat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्याहून अलिबागला जाणार्‍या खासगी बसला ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) भीषण अपघात (Pune Pimpri Accident News) झाला असून त्यात २ महिलांचा मृत्यु (Death) झाला आहे. बसमधील ५५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात (Pune Pimpri Accident News) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुण्याहून एम एच ०४ एफ के ६२९९ ही बस माणगावकडे जात होती. ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व ती घाटात रस्त्यावरुन खाली जाऊन उलटली. त्यात बस ही पुर्णपणे उलटी झाली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघाताची (Pune Pimpri Accident News) माहिती मिळताच माणगाव पोलीस (Mangaon Police) तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी प्रवाशांना मिळेल त्या वाहनांतून माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमीवर उपचार करण्यात येत आहेत.

Related Posts