IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह तिघांनी केला बलात्कार

by sachinsitapure
Minor Girl Rape Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या (Violence Against Women) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनामुळे संताप व्यक्त होत असताना पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढवा येथे एका अल्पवयीन (Minor) कर्णबधिर मुलीवर तिच्या मित्र, भावासह तिघांनी बलात्कार (Raped Deaf Girl in Pune) केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीने तिच्या शिक्षिकेकडे कैफियत मांडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंढवा परिसरातील केशवनगर येथील एका सोसायटीत सन 2018 पासून 2023 पर्यंत सुरु होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कर्णबधीर शाळेच्या एका 51 वर्षीय महिला शिक्षिकेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) बुधवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर रजाने (वय-30 रा. उंड्री, कोंढवा), राहुल पाटील (वय-23) यांच्यासह एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर (पीडितेचा भाऊ) आयपीसी 376, 376/2/एन, 323, 506 सह पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षाची आहे. आरोपी सागर याने पीडित मुलगी रहात असलेल्या
घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तसेच तिला माराहण करुन याबाबत कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली.
तर पीडित मुलीच्या अल्पवयीन भावाने ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच पीडित मुलीचा मित्र राहुल पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर शिक्षिकेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosle) करीत आहेत.

Related Posts