IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ वादातून तरुणाचा खून, हडपसर पोलिसांकडून 6 जणांना अटक

by sachinsitapure
Murder

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरुन 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला धारदार हत्याराने व दगडाने मारहाण (Beating) करुन खून (Murder) केला. ही घटना मंगळवारी (दि.12 डिसेंबर) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी ते चंदवाडी रोडवर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सहा जाणांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अभिषेक संजय भोसले Abhishek Sanjay Bhosale (वय 30 रा. शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट (वय-38), कैलास सुरेश सकट (वय-20), सचिन संजय सकट (वय-29), प्रमोद ज्ञानेश्वर राखपसरे (वय-19) प्रशांत ज्ञानेश्वर राखपसरे (वय-21), ज्ञानेश्वर प्रभु राखपसरे (वय-78 सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यावर आयपीसी 302, 323, 143, 145, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत भोसले यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय-18 रा.ऑर्चीड रिसिडेन्सी शेवाळवाडी ता. हवेली पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

खुनाच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके पुणे आणि बारामती येथे रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत आरोपी आणि मयत अभिषेक यांच्यात 12 डिसेंबर रोजी सांयकाळी 6 च्या सुमारास किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन रात्री दहाच्या सुमारास अभिषेक याच्यावर हत्याराने वार करुन व दगडाने मारहाण करुन खून केल्याचे सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव (API Nanasaheb Jadhav) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R. Raja)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Senior PI Ravindra Shelke), पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle)
यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde), पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde), पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसरकर, रामदास जाधव यांच्या पथकाने केली.

Related Posts