IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार

by sachinsitapure
Molestation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन 13 वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करुन मानसिक त्रास दिला. मुलगी क्लासवरुन घरी येत असताना भररस्त्यात तिला अडवून तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्याकडे शरीर संबंधाची (Physical Relationship) मागणी करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 29 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील वेताळ मंदिराच्या समोर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 41 वर्षीय आईने बुधवारी (दि.7) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन धिरज नितीन शिंपी (वय-21 रा. रेल्वे गेट, मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 354(अ), 354(ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मांजरी येथील एका शाळेत इयत्ता 8 वी मध्ये शिकते.
आरोपी मागील सहा महिन्यापासून मुलीचा पाठलाग करत आहे. 29 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी
यांची मुलगी क्लासवरुन घरी जात होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिचा
पाठलाग केला. वेताळ वस्ती येथील वेताळ मंदिरासमोर गाडी आडवी लावून मुलीला आडवले. तिचा हात पकडून अश्लील बोलून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.

Related Posts