IMPIMP

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी

by sachinsitapure
Former Bodyguard of MLA Rohit Pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Hadapsar Crime | रस्त्यावरुन जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन किरकोळ वाद सुरु असताना आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या माजी अंगरक्षकाने पिस्तुल काढून तरुणावर रोखले. गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा प्रकार हडपसर येथील माळवाडीमध्ये घडला. (Pune Hadapsar Crime )

हडपसर पोलिसांनी प्रताप धर्मा टक्के (वय ३९, रा. के डी हिल्स, शेलार मळा, कात्रज) याला अटक केली आहे. त्यांच्याकडील पिस्तुल जप्त केले आहे. याबाबत सौरी तानाजी काळे (वय २७, रा. हडपसर गाव) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद ( गु. रजि. नं. २५२/२४) दिली आहे. हा प्रकार माळवाडी येथे बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडला.

प्रताप टक्के हा आमदार रोहित पवार यांच्याकडे जून ते डिसेंबर २०२३ दरम्यान खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सध्या तो त्यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दुचाकीवरुन जात होते. यावेळी त्यांच्या गाडीचा प्रताप याच्या दुचाकीला धक्का लागला. यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला.

तेव्हा प्रताप याने फिर्यादी यांच्या अंगावर धावून आपल्याकडील पिस्तुल काढून त्यांच्यावर रोखले. फिर्यादी व त्यांच्या मित्राला नादी लागू नका एकेकाला गोळ्या घालीन, असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी प्रताप याच्याकडील विदेशी बनावटीचे पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.सहायक पोलीस निरीक्षक एस व्ही लोणकर अधिक तपास करीत आहेत.

Related Posts