IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : इंन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीवर अत्याचार, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

by sachinsitapure
Physical Relationship

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच पीडित मुलीच्या भावाला दोघांचे फोटो पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी लातूर येथील तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अक्कलकोट तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून आदित्य रमेश बिराजदार (रा. जोगन चिंचोळी ता. औसा जि. लातुर) याच्यावर आयपीसी 376/2/द, 323, 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत वडकी नाला येथील भाड्याच्या खोलीत घडला आहे.

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपीची
ओळख इंन्स्टाग्रामवर झाली. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर दोघेही वडकी नाला येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी केली.

तसेच लग्नपत्रिका तयार करुन त्यावर दोघांचे फोटो लावले. तर एका वृत्तपत्राच्या कात्रणावर दोघांचा एकत्र असलेला
फोटो लावून मुलीबाबत मजकूर लिहिला. लग्न पत्रिका आणि कात्रण पीडित मुलीच्या भावाच्या इंन्स्टाग्रामवर पाठवले.
तसेच एडिट केलेला दोघांचा फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी भावला दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय दाभाडे करीत आहेत.

Related Posts