IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | दिवसा घरफोड्या करणाऱ्या परराज्यातील टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

by sachinsitapure
Kondhwa Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दिवसा घरफोडी करुन रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने (Gold Jewelry) चोरणाऱ्या दोन परराज्यातील चोरट्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून कोंढवा आणि लष्कर पोलीस ठाण्यातील (Lashkar Police Station) दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून दोन लाख रुपये रोख व सहा लाख रुपयांचे दागिने असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अहमद मुन्ना मलिक (वय-49 रा. दुसरका 20 फुटा, मेरेठ, उत्तर प्रदेश), यासीन अलीमुद्दीन मलिक (वय-47 रा. जाकीर हुसेन कॉलनी मेरठ हापुर रोड, जि. मेरठ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई 20 जानेवारी रोजी पुणे स्टेशन येथे केली. आरोपींना रेल्वेत बसून पळून जात असताना अटक केली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंड्री भागातील राजदीप कॉम्पलेक्स येथे दिवसा घरफोडीची घटना घडली होती. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी 150 हून अधिक सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही तपासत असताना
पोलीस अंमलदार शाहीद शेख व संतोष बनसुडे यांना दोनजण घटनास्थळावरुन संशयितरित्या जाताना दिसले. पोलिसांनी आरोपींबाबत माहिती घेतली असता ते वानवडी भागातील सय्यदननगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. आरोपी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते मुळ गावी पळून जात असल्याचे समजताच पोलिसांनी पुणे स्टेशन येथे सापळा रचला. त्यावेळी आरोपी रेल्वेत बसून पळून जात असताना त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी उंड्री भागात आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोलेदिना रोड वरील गितांजली सोसायटीत दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम व सहा लाख रुपयांचे दहा तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिन असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी चोरलेला मुद्देमाल हडपसर येथील एका भंगाराच्या दुकानात अडगळीत लपवून ठेवला होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा, सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, शाहीद शेख, संतोष बनसुडे,
लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts