IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, दोन लाखांचे कपडे जप्त

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात फसवणुकीच्या अनेक घटना दररोज उघडकीस येत आहेत. मात्र, आता थेट पुमा कंपनीचा बनावट लोगो (Puma Company Fake Logo) वापरून ग्राहकांना कपड्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कपड्यांची विक्री करुन दुकानदाराने अनेक ग्राहकांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन लाखांचे कपडे जप्त केले आहेत. ही कारवाई मांजरी बुद्रुक येथील मॅक्स कापड दुकानात शनिवारी (दि.27) करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कंपनीचे कॉपीराईट फिल्ड ऑफिसर योगेश दशरथ मोरे (वय-48 रा. कोथरुड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आसिफ पोपट तांबोळी (वय-26 रा. महादेव नगर, मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर कॉपीराईट अॅक्ट कलम 51,53 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आर.एन.ए.आय.पी एटोर्नी कंपनीचे फिल्ड ऑफिसर आहेत. याच कंपनीच्या पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा अधिकृत लोगो आणि नावाचा गैरवापर करुन कपड्यांची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली होती. याची शाहनिशा करुन पोलिसांनी छापा टाकून सर्व कपडे जप्त केले आहेत.

पोलिसांनी 2 लाख 12 हजार 750 रुपये किमतीचे पुमा कंपनीच्या एकूण 55 शॉर्टस पॅन्ट, 110 टी शर्ट जप्त केले आहे. पोलिसांनी या कारवाईत मुद्देमाल जप्त करुन दुकान मालक आसिफ तांबोळी याच्यावर कॉपराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार भापकर, पाटोळे, सोनवणे, दुधाळ, गोरखे यांच्या पथकाने केली.

Related Posts