IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जागा विक्री करायची असल्याचे सांगून एका महिलेची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका विकीलासह चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे. हा प्रकार सन 2020 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत टिळक रोडवरील कॉसमॉस बँकेच्या शाखेत तसेच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सिंहगड रोड परिसरातील 58 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.30) विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन जागा मालक प्रसाद प्रकाश खैरे (वय-40 रा. बिबवेवाडी, पुणे), महिलेचा पुतण्या शुभम गिरीश भोसले (वय-29), महिलेचा दिर गिरीश भोसले (वय-55 दोघे रा. वडगाव शेरी, पुणे), अॅड. संजय तानाजी मोरे (वय-50 रा. वडगाव शेरी, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल करुन प्रसाद खैरे व शुभम भोसले याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा दिर व पुतण्या यांनी वडगाव शेरी येथील प्रसाद खैरे यांच्या मालकीचा नुर मंजिल बंगला ही जागा 1 कोटी 35 लाखांना विकायची असल्याचे सांगितले. आरोपींनी जागेचे टायटल क्लिअर असल्याचे सांगून अॅड. संजय मोरे याच्याशी संगनमत करुन खोटा नोटराईज दाखल तयार केला. या दाखल्याची झेरॉक्स फिर्यादी यांना देऊन जागेच्या व्यवहारापोटी महिलेकडून वेळोवेळी 95 लाख रुपये जागा मालक प्रसाद खैरे याच्या बँकेच्या कर्ज खात्यात भरण्यास सांगितले. मात्र, प्रसाद खैरे याने भरलेली रक्कम फिर्यादी यांच्या परस्पर काढून घेतली. हा प्रकार समजताच महिलेने पोलिसांकडे तक्रार केली.

यानंतर जागा मालक आणि महिलेमध्ये समजुतीचा करारनामा होऊन जागा मालकाने तीस लाख रुपये परत केले. तर महिलेचा पुतण्या शुभम याने इतर आरोपींच्या नावाने चेक घेऊन ते बँकेत वटवून पैसे घेतले. यानंतर शुभम याने जादा बांधकाम करु असे सांगून महिलेकडून पैसे घेतले. मात्र, बांधकाम नकरता महिलेची फसवणूक केली. आरोपींनी संगनमत करुन महिलेची 1 कोटी 5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.