IMPIMP

Pune PMC News | मराठा समाज सर्वेक्षण मोहीमेत पालिकेने कनिष्ठ अभियंते, मुख्याध्यापक आणि अतिक्रमण निरीक्षकांनाही उतरवले

सर्वेक्षणाच्या कामामुळे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांअभावी कामे थांबली

by sachinsitapure
Maratha Society Survey

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या मराठा समाज सर्वेक्षणाचे (Maratha Society Survey) काम वेळेत पुर्ण व्हावे यासाठी महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) आणखी एक हजार २७ प्रगणकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आजपासून तब्बल तीन हजारांहून अधिक प्रगणक सर्वेक्षणाचे काम करत आहेत. विशेष असे की या कामामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक, शालेय शिक्षकांसोबतच आता कनिष्ठ अभियंते, अतिक्रमण निरीक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनाही सहभागी करून घेतल्याने महापालिकेची कार्यालये ओस पडली असून नागरिकांच्या कामांना बे्रक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Pune PMC News)

मराठा समाजाचे मागासलेपण जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात २३ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र ऑनलाईन ऍप तयार करण्यात आले असून मराठा समाजाच्या कुटुंबांकडून यामध्ये १५४ प्रश्‍नांची उत्तरे घेण्यात येत आहेत. मराठा व्यतिरिक्त अन्य समाजाची माहिती अवघ्या पाच प्रश्‍नांपुरती मर्यादीत आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये साडेबारा लाख कुटुंब राहात असून आतापर्यंत पाच लाखांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. या कामासाठी महापालिकेने टप्प्याटप्प्याने तीन हजारांहून अधिक प्रगणक नेमले आहेत. प्रजासत्ताक दिनाला जोडून सलग तीन सुट्टया आल्याने अनेक ठिकाणी प्रगणकांना घरे बंद अवस्थेत आढळली. तर काही सोसायट्यांमध्ये प्रवेश मिळविताना वादाचे प्रसंगही घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाच लाखांहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण झाले असले तरी एकूण कुटुंबांच्या ३५ टक्केच सर्वेक्षण झाल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे राहीले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने आणखी एक हजार २७ कर्मचार्‍यांची प्रगणक म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनाही नियुक्त करण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यालयांसोबतच शाळांमध्येही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

यासंदर्भात या मोहीमेच्या सह नोडल अधिकारी व महापालिकेच्या उपायुक्त चेतना केरुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या २६ जानेवारी रोजी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रगणकांनी सर्वेक्षण केले आहे. राज्यात पुणे महापालिकेत सर्वाधिक सर्वेक्षण झाले असले तरी कुटूंबांची संख्या पाहाता टक्केवारी कमी आहे. यासाठी अधिकच्या प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विहीत मुदतीत अधिकाअधिक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Related Posts