IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाकडून जामीन मंजूर

by nagesh
Court

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | मैत्रिणीसोबत बोलला या कारणावरुन मनात राग धरुन हातात कोयते घेऊन दुचाकीवरुन पाठलाग करुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना घडली होती. ही घटना (Pune Pimpri Chinchwad Crime) 6 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद (Talegaon Dabhade Municipal Council) रोडवर घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी रोहित शिवपुत्र सोनकांबळे (Rohit Shivputra Sonkamble) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ (District and Additional Sessions Judge Vadgaon Maval) येथील न्यायालयाचे न्यायाधीश एस एस पल्लोड (Judge SS Pallod) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली.

या गुन्ह्यातील आरोपी रोहित शिवपुत्र सोनकांबळे याने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ येथील न्यायालयात दाखल केला. आरोपीचे वकील यांनी बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले की, फिर्यादीनुसार अर्जदार आरोपी याची या गुन्ह्यात भूमिका नाही. अर्जदार आरोपी हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. आरोपी हा 29 वर्षांचा असून कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आरोपी अर्जदार हा सराईत गुन्हेगार नसून त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे इतर जास्त गुन्हे नाहीत. त्याचप्रमाणे जो जखमी होता त्याला कसलेही प्रकारची (Injury) दुखापत झालेली नाही. आरोपी यांना खोट्या केसमध्ये अडकवले आहे. आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड कोर्टाने आरोपीला अटी व शर्तीवर जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. (Pune Pimpri Chinchwad Crime)

आरोपी रोहित शिवपुत्र सोनकांबळे याच्यामार्फत ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी जामीन अर्जावर युक्तिवाद केला. तसेच ॲड. आनंद चव्हाण (Adv. Anand Chavan), ॲड. अक्षय पवार (Adv. Akshay Pawar) यांनी मदत केली.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी ध्रुव महेश खिल्लारे याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादनुसार कुणाल ठाकूर व त्याचे इतर सर्व साथीदारांवर आयपीसी 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीचा मित्र मोसम शाहू याने चिक्या शिंदे याच्या मैत्रिणी सोबत बोलला या कारणावरून चिक्या शिंदेने गुन्ह्याच्या 4 ते 5 दिवस अगोदर मारहाण करून, अर्ध नग्न करून त्यास फुलांचा हार घालून व्हिडिओ बनवला होता.

फिर्यादीचा मित्र मोसम शाहू हा चिक्या शिंदे याच्या मैत्रिणी सोबत बोलला याचा राग मनात धरून कुणाल ठाकूर,
चिक्या शिंदे व इतर असे सर्व एकूण 20 ते 22 साथीदार आरोपींनी दाभाडे एम्पायर सोसायटी,
वतन नगर जवळ दिनांक 6/11/2022 रोजी रात्री 10:30 ते 11:00 दरम्यान फिर्यादी व
त्याचा मित्र दर्शन कट्टीमणी दोघे दुचाकी वरून जात होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

त्यावेळी वरील आरोपींनी हातात कोयते घेऊन 6 ते 7 दुचाकीने पाठलाग करून,
जोरजोरात आरडाओरडा व शिवीगाळ करून दहशत निर्माण करून काका हलवाईच्या दुकानासमोर,
नगरपरिषद रोड, तळेगाव दाभाडे येथे जाताना फिर्यादीची मोटरसायकल स्लिप झाली आणि
चिक्या शिंदेने फिर्यादीस म्हणाला की “त्या मोसम शाहू सोबत राहून तुला जास्त मस्ती आली आहे तुला जिवंत सोडणार नाही”
असे बोलून, फिर्यादीने मानेवर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला
त्यावेळी फिर्यादी याने वार चुकवून नाल्यामध्ये उडी मारली.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime | Vadgaon Maval court grants bail to accused in attempted murder

Related Posts