IMPIMP

CM Eknath Shinde | ‘डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं’, अजित पवारांच्या शपथ विधीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

by nagesh
CM Eknath Shinde | ajit pawar takes oath as dcm cm eknath shindes reation on ajit pawar joins hands with bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics News) आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी (NCP MLA) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर (DyCM Oath) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1675438464039550976?s=20

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) नेते व मंत्री यांच्या उपस्थित अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ (DyCM Oath) घेतली आहे. आज अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram), आदिती तटकरे (Aditi Tatkare), संजय बनसोडे (Sanjay Bansode), अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Maharashtra Politics News)

डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यामध्ये आज अजितदादा पवार
आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी आपल्या शिवसेना-भाजप युतीच्या (Shiv Sena-BJP Alliance)
डबल इंजिन सरकारला विकासासाठी साथ दिली आहे. अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कर्तृत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेव्हा अशा घटना घडत असतात, हे आपण आधीही पाहिलं आहे.
डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं आहे. राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल.
महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल, राज्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title : CM Eknath Shinde | ajit pawar takes oath as dcm cm eknath shindes reation on ajit pawar joins hands with bjp

Related Posts