IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला’, राज्यातील सत्ता बदलावर राज ठाकरेंनी ओढले ताशेरे

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | raj thackerays sharp criticism on the change of power in politics see exactly what they said

मुंबई : रकारसत्ता ऑनलाईन – अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Ajit Pawar DyCM Oath) घेतली. अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. या सत्तानाट्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेच्या खेळावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. आजच्या महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील (Sinshan Cinema) शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, असं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटले.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करुन राज्यातील सत्ता बदलावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) ओझं शरद पवारांना (Sharad Pawar) उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची-NCP) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1675444262220222466?s=20

तसंही महाराष्ट्र भाजपला (BJP) शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधल्याचं राज ठाकरे म्हणाले. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे
खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?,
असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | raj thackerays sharp criticism on the change of power
in politics see exactly what they said

Related Posts