IMPIMP

Pune Pimpri Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोच्या मित्राचा भोसकून खून

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Pimpri Crime | बायकोचे अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याचा संशयातून एका इसमाने तिच्या जवळच्या मित्राचा भोसकून खून (Murder) केला आणि त्याला दहाव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करून महिलेचा पती पंकज शिंदे (Pankaj Shinde) याला अटक (Arrest) केली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव निलेश अशोक जोर्वेकर (Nilesh Ashok Jorvekar) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे तिच्या मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी पंकज शिंदे याला होता. यामुळे तो या दोघांच्या मागावर होता. दोन दिवसांपूर्वी पंकजने मी गावी जात आहे असे पत्नीला सांगितले आणि तो घराबाहेर पडला. याच दरम्यान पंकजच्या पत्नीला तिचा मित्र निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. दरम्यान पाळत ठेवून असलेला पंकज एक दिवस अगोदरच गावावरून आला. त्याने घराबाहेरून पाहिले असता निलेश आणि त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या घरात जाताना दिसले. त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथे पंकज पोहचला. (Pune Pimpri Crime)

 

यानंतर निलेश आणि पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले.
या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. यानंतर संतापलेल्या पंकजने निलेशला घराच्या दहाव्या मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिले. यात निलेशचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंकजला अटक करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | husband kills wifes friend on suspicion of extramarital affair in pimpri pune news

 

हे देखील वाचा :

Tata Airbus Project | ‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरे आणि देसाईंना थेट आयटी आणि सीबीआयची धमकी

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा रवी राणांना संतप्त सवाल, मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?

Bachchu Kadu | माझे राजकारण चुलीत गेले तरी बेहत्तर, आता माघार नाही – बच्चू कडू

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली

 

Related Posts