IMPIMP

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

by sachinsitapure
Prostitute Racket

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी (PCPC Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई साईनगरी येथील अगत्य लॉज येथे बुधवारी (दि.29) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली आहे. (Pune Pimpri Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

लॉज मॅनेजर अजय रमेश रणदिवे (वय-25 रा. साई मंदिराजवळ, वडमुखवाडी), अजय दत्ता हरणे (वय-25 रा. सावरी ता. निलंगा, जि. लातुर) यांना अटक केली आहे. तर संजय पवळे याच्यावर आयपीसी 370 (3) 34 सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सोमनाथ बाळु खळसोडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणदिवे आणि हरणे या दोघांनी एका महिलेला पैशाचे आमिष दाखवून
तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. यातून मिळणाऱ्या पैशावर दोघांनी आपली उपजीविका भागवली.
याप्रकरणी माहिती मिळताच दिघी पोलिसांनी अगत्य लॉजवर छापा मारुन कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका
करुन दोघांना अटक केली. तसेच 8 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघमोडे (PI Waghmode) करीत आहेत.

Related Posts