IMPIMP

Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग

by nagesh
Rape

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | लहानपणी गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीने महिलेचा फोन नंबर मिळवून तिला फोन केला.
तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार
मागील दीड महिन्यापासून सुरू होता. (Pune Pimpri Crime)

 

याबाबत 42 वर्षांच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश गंगाधर जाधव (वय – 43 रा. सुभश्री कॉलनी, सिडको एन-5, औरंगाबाद) याच्यावर आयपीसी 354 (ड), 506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी लहानपणी औरंगाबाद येथे राहत असताना आरोपी त्यांच्या गल्लीत राहत होता. दीड महिन्यापूर्वी आरोपीने फेसबुकवरून फिर्यादी यांचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर त्याने महिलेला फोन करून माझ्याशी बोल, मला तुला भेटायचे आहे म्हणून वारंवार फोनवरून त्रास दिला. दरम्यान, फिर्यादी यांनी त्याचा फोन घेतला नाही. आरोपीने फिर्यादी यांचा मुलांच्या शाळेपर्यंत पाठलाग केला. तसेच भेटण्यास बोलावून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांनी याकडे दुर्लक्ष केले असता आरोपीने फिर्य़ादी यांची औरंगाबाद येथे राहणारी आई, मुलांना व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | The woman was molested by threatening to kill the family

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’

Gold Price | सोने विकत घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; तज्ज्ञाने व्यक्त केलं ‘हे’ मत

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा गुजरातमध्ये विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…म्हणून काँग्रेस नेत्यांनी PM मोदींना शिव्या देणं सुरू केलं’

Genelia Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाला बँकांकडून 116 कोटी रूपये कर्ज देण्यात ‘गडबड’ झाल्याचा आरोप, सरकारने दिले चौकशीचे आदेश

 

Related Posts