IMPIMP

Pune PMC Hospital News | महंमदवाडीतील कौसरबाग येथे DBFOT तत्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलची उभारणी; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मागविले प्रस्ताव

by sachinsitapure
Pune PMC Hospital News | Construction of Multispeciality Hospital on DBFOT basis at Kausarbagh in Mahamadwadi; Health Department of Pune Municipal Corporation called for the proposal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Hospital News | महापालिकेच्यावतीने महंमदवाडीतील (Mohammed Wadi) कौसरबागमध्ये (Kausar Baugh) हॉस्पीटलचे आरक्षण असलेल्या जागेवर येथे बांधा, वापरा, हस्तांतरण करा (DBFOT) तत्वावर ७५ ते १०० बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पीटलसाठी महापालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार असून बांधकामासह हॉस्पीटल चालविण्याचा खर्च संबधित संस्थेला करायचा आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने निविदा काढली आहे. (Pune PMC Hospital News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कौसरबाग येथील १६ गुंठे जमीनीवर हॉस्पीटलचे आरक्षण आहे. या परिसरात महापालिकेचे सर्व प्रकारच्या उपचारांवरील एकही हॉस्पीटल नाही. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने डीबीएफओटी तत्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हॉस्पीटलचे बांधकाम, उपचार सुविधा तसेच मेडीकल स्टाफ यासाठी लागणारा खर्च तसेच तज्ज्ञ मेडीकल स्टाफची अडचण या पार्श्‍वभूमीवर डीबीएफओटी तत्वावर हे हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जागा वाटप नियमावलीनुसार ३० वर्षांसाठी हे हॉस्पीटल संबधित संस्थेला चालविण्यास देण्यात येणार आहे. (Pune PMC Hospital News)

याठिकाणी ७५ ते १०० बेडस्चे हॉस्पीटल होउ शकणार आहे. रुग्णालयाच्या क्षमतेपैकी महापालिकेने पाठविलेल्या रुग्णांसाठी १० टक्के तसेच सीजीएचएस दरामधील रुग्णांसाठी १० टक्के बेडस् राखीव असावेत, अशी महापालिकेची अपेक्षा असेल. अधिकाअधिक सवलत व सुविधा देण्यासोबतच महापालिकेच्या अटींची पूर्तता करू शकणार्‍या संस्थेचाच यासाठी विचार करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल अद्याप पुढे सरकले नाही

वारजे येथे डीबीएफओटी तत्वावर ३५० बेडसचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला महापालिकेने
मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होउन सुमारे दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे.
या हॉस्पीटलसाठी ३६० कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी संबधित संस्था आंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेणार आहे.
या कर्जाला महापालिका जामीनदार राहाणार आहे.
ठेकेदार कंपनीच्या कर्जाला महापालिका जामीन राहात असल्याची बहुधा ही पहिलिच वेळ आहे. यासाठी राजकिय दबाव टाकण्यात आल्याचीही चर्चा असून सामाजिक संस्थांनी आणि काही माजी नगरसेवकांनी याविरोधात रानही उठविले आहे. परंतू महापालिकेने पायघड्या घालूनही संबधित संस्था अद्यापही हे कर्ज आणि कर्जाचा विमा उतरविण्यात अपयशी ठरली आहे. अशातच कौसरबाग येथे डीबीएफओटी तत्वावर हॉस्पीटल उभारण्याचा प्रस्ताव आला आहे. विशेष असे की या प्रकल्पामध्ये महापालिकेने कर्जाची जबाबदारी सोडाच परंतू अन्य कुठलिही अन्य आर्थिक मदतीची हमी देणे पहिल्या टप्प्यावर तरी टाळले आहे.

 

Related Posts