IMPIMP

Pune Crime News | कोंढवा: अनैतिक प्रेमसंबंध असताना महिला निघून गेल्याने मुलाला धमकी

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | प्रेमसंबंधातून (Love Affair) एकत्र राहात असताना अचानक महिला निघून गेली. तुझ्या आईला कोठे लपवून ठेवले आहेस, असे विचारुन मुलाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कोंढवा येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद
दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका ४१ वर्षाच्या गृहस्थाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिासंनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच वस्तीमध्ये रहातात.
फिर्यादी यांची आई व आरोपी यांचे प्रेमसंबंध आहेत. त्यातून फिर्यादीची आई सुमारे १५ दिवसांपासून आरोपीच्या घरी
राहात होती. फिर्यादीची आई अचानक कोठेतरी निघून गेली. त्यामुळे आरोपी हा वारंवार फिर्यादीला फोन करुन तू
तुझ्या आईस कोठे लपवून ठेवले ते सांग असे म्हणून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे.

 

Related Posts