IMPIMP

Pune PMC News | महागाईमध्ये जनते सोबतच महापालिकाही भरडतेय ! वीज, पाणीपट्टी पाठोपाठ GST वाढीचा मनपाला फटका; विकासकामांवरील जीएसटी 12 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढविला

by nagesh
Pune PMC News | Along with the people, Pune Municipal Corporation is also suffering from inflation! Electricity, water supply followed by GST hike; GST on development works increased from 12 to 18 percent

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | इंधन आणि वीज दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळली असताना महापालिका प्रशासनही यातून सुटलेले नाही. नुकतेच जलसंपदा विभागाने पालिकेच्या पाणीपट्टीत साधारण अडीचपट वाढीचा प्रस्ताव ठेवला असताना आता १८ जुलैपासून होणार्‍या जीएसटी वाढीचा फटकाही विकासकामांना बसणार आहे. जीएसटी कौन्सिलने विकासकामांसाठी लागणार्‍या बहुतांश वस्तुंवरील GST १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने ‘विकासकामे’ देखिल महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune PMC News)

 

जीएसटी कौन्सिलने १८ जुलैपासून खाद्यान्नांवर ५ टक्के जीएसटी आकारणीचा निर्णय घेतला आहे. यामुळे अगदी पॅकड् दुधापासून अन्नधान्य व अन्य खाद्यपदार्थांची दरवाढ होणार आहे. याचा थेट फटका शेवटच्या ग्राहकाला बसणार आहे. सातत्याने होणारी इंधन दरवाढ आणि वीज दरवाढीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेली जनता खाद्यान्नावर जीएसटी आकारणीनंतर महागाईच्या खोल खाईत लोटली जाणार आहे. खाद्यान्नांसोबतच जीएसटी कौन्सिलने वीट बांधकाम, रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे, मेट्रो, ट्रीटमेंट प्लॅन्टस, स्मशानभूमीचे बांधकाम, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, धरण व कालव्यांचे बांधकाम, पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्र, शैक्षणिक संस्था, रुग्णालयांसारख्या वास्तूंच्या बांधकामे, तसेच डांबरावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. (Pune PMC News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जीएसटीचा भरणा हा ठेकेदारांकडूनच महापालिकेला आणि महापालिकेकडून जीएसटीकडे होत असतो. त्यामुळे जीएसटी वाढला तरी तो ठेकेदारांकडूनच वसुल केला जाणार आहे. त्यामुळे १७ जुलैनंतर होणार्‍या कामांचे एस्टीमेट देखिल वाढीव जीएसटीनुसार होणार आहे. महापालिका दरवर्षी सुमारे २ हजार कोटी रुपये वरिल स्वरुपाच्या विविध विकासकामांवर खर्च करते. त्यामुळे ठेकेदारांना नवीन जीएसटी दरानुसार ६ टक्के अधिक पैसे अर्थात जवळपास १२० कोटी रुपये अतिरिक्त जीएसटी भरावा लागणार आहे. याचा थेट फटका पुणेकरांना बसणार असून हा वाढीव जीएसटी पुणेकरांच्या खिशातूनच जाणार असून विकासकामांवरही त्याचा परिणाम होणार आहे.

 

 

दरम्यान, जीएसटी दर वाढल्याने मुख्य लेखा अधिकार्‍यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून १७ जुलैनंतर नवीन दराने जीएसटी आकारणीचे आदेश दिले आहेत. तसेच यापुर्वी दिलेल्या कामांची बिले १७ जुलैपुर्वी जेवढे काम झाले असेल ती जीएसटीच्या जुन्याच दराने अर्थात १२ टक्के दराने सादर करावीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

महापालिकेला असा बसणार फटका

वीज दरामध्ये ५ टक्के वाढ झाल्याने अगोदरच महापालिकेला वीज बिलापोटी १० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
जलसंपदा विभागाने पाणीपट्टीमध्ये सुमारे अडीचपट वाढ सुचविल्याने अतिरिक्त १२० कोटी रुपयांचा बोजा पडण्याची शक्यता आहे.
तर आता जीएसटीमध्ये ६ टक्के वाढ झाल्याने विकासकामांना त्याचा फटक बसणार आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Along with the people, Pune Municipal Corporation is also suffering from inflation! Electricity, water supply followed by GST hike; GST on development works increased from 12 to 18 percent

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price Today | पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी; जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

MLA Pratap Sarnaik | ‘…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उल्हासनगरातील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील’ – प्रताप सरनाईक

 

Related Posts