IMPIMP

Pune PMC NEWS | कोरोनाच्या साथीमध्ये बँक बॅलन्स ‘मायनस’ झाला ! महापालिका शाळेतील 7 हजार विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ‘डीबीटी’द्वारे पैसे मिळण्यात अडचण

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC NEWS | केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिका Pune Municipal Corporation (PMC) देखिल शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीसाठीची रक्कम डीबीटीद्वारे (DBT) थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करत आहे. परंतू कोरोना काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून येणार्‍या सुमारे ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा बँक बॅलन्स ‘मायनस’ मध्ये गेल्याने बँकेने खाती बंद केली आहेत. (Pune PMC NEWS)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गणवेश, बूट, शैक्षणिक साहित्य खरेदी मधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महापालिकेने मागील काही वर्षांपासून केंद्र शासनानुसार विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी पद्धत सुरू केली आहे. या अंतर्गत या खरेदीसाठी येणारा खर्च थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतो. केंद्र शासनाच्याच धोरणानुसार अनेक विद्यार्थ्यांनी झिरो बॅलन्सनुसार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाती काढलेली आहेत. (Pune PMC NEWS)

 

दरम्यान मागील दोन वर्ष कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने महापालिकेने या दोन वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पैसे दिलेले नव्हते. दरम्यान, यंदा शाळा सुरू झाल्यानंतर महापालिकेने गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे देण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे १ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून आतापर्यंत ४७ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा करण्यात आले आहेत.

 

मात्र यादरम्यान तब्बल ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची बँक खाती बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मायनस बॅलन्स आहे.
बँकांमध्ये गेल्यावर अगोदर काही रक्कम भरण्यास सांगितली जात असल्याने पालक पाठ फिरवत आहेत.
बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे मोल मजुरी करणारे असून अशिक्षितही आहे.
बँकेमध्ये गेल्यावर व्यवस्थित मार्गदर्शनही होत नसल्याने पुन्हा बँकेत जाण्यासाठी पालक अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे.
तर काहीवेळा नवीन बँक खाते काढताना कागदपत्रांची अडचण निर्माण होत असल्यानेही पालक बँक खाती काढण्याकडे पाठ फिरवत आहेत.
त्यामुळे महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या काही विद्यार्थ्यांची बँक खाती बंद झाल्याने डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
परंतू संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते काढण्यात येत असून त्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे वर्ग करण्यात येत आहेत.
संयुक्त खात्यात पैसे जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पैसे देण्यात येतात.
त्या बिलांचा अहवाल तयार करण्यात येत आहे.
येत्या १५ ऑगस्टला महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेच्या गणवेशात दिसतील, असा आमचे प्रयत्न आहेत.

विलास कानडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (- Vilas Kanade, Additional Municipal Commissioner)

 

 

Web Title :- Pune PMC NEWS | Bank balance has become minus in the wake of Corona Difficulty in getting money through DBT for purchasing uniforms and educational materials for 7 thousand students of municipal schools

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचा टोला, म्हणाले – ‘मी फिक्स मॅच पाहत नाही, लाईव्ह मॅच पाहतो’

Fuel Tax Update | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या दरम्यान अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pune Crime | मालमत्तेच्या वादातून सुनेने चक्क घराचा दरवाजाच बदलला; साडेचार लाखांचा ऐवज चोरुन घरावर लावले स्वत:चे नाव

 

Related Posts