मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी आज (मंगळवार) सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यात झालेल्या सत्तांतर यासाठी कारणीभूत ठरलेले शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Rebel Leader Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) सकडून टीका केली. भाजप शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करण्याचा डाव खेळत आहे. सध्या राज्यात हम तुम एक कमरे में बंद हो, असं सरकार चालू असल्याची टीका केली होती. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. मी फिक्स मॅच (Fixed Match) पाहत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीमधून राज्यातील सरकार आणि भाजपवर टीका केली आहे, त्याबाबत काय म्हणाल, असं देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहतो. खरी मॅच बघतो. ही मुलाखत म्हणजे फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर प्रतिक्रिया द्यायची ? काही दिवसांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा प्रतिक्रिया देऊ, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी वढू येथील संभाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाचा (Sambhaji Maharaj Memorial) निधी स्थगित केल्याचा आरोप फेटाळून लावला.
ते म्हणाले, दादांसारख्या माणसाने असा आरोप करताना फाईलवर काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे होतं.
मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिलंय की, या कामाला स्थगिती देणं योग्य होणार नाही.
उलट या संदर्भात काय काय कामं घेतली आहेत.
त्या संदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर करावं.
त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Web Title :- Devendra Fadnavis | shivsena chief uddhav thackerays scathing criticism of shinde government bjp now devendra fadnavis brief reaction said
Fuel Tax Update | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या दरम्यान अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकार सुस्साट ! 24 दिवसांतच काढले तब्बल 538 GR