IMPIMP

Pune PMC News | केशवनगर येथे गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीररित्या व्यावसायीक वापर ! बोगस पुराव्यांच्या आधारे जागा मिळवून देणार्‍या ‘दलालांचा’ सुळसुळाट

संबधितांवर कारवाई करावी - भाजपचे सरचिटणीस संदीप लोणकर यांची मागणी

by nagesh
Pune PMC News | Illegal commercial use of the land given for cows in Keshavnagar A flurry of brokers who get seats based on bogus evidence

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | महापालिकेने शहरात पशु पालन करणार्‍यांना मुंढवा – केशवनगर येथे गोठ्यांसाठी जागा दिल्या आहेत. परंतु त्याठिकाणी प्रत्यक्षात पशुपालनाऐवजी अनधिकृतपणे बांधकामे करून अन्य व्यवसाय सुरू आहेत. प्रशासनाने गोठेधारकांनी सादर केलेली कागदपत्रे आणि प्रत्यक्ष जागेवर सुरू असलेल्या व्यवसायांची पाहाणी करून अतिक्रमणे काढून दोषींवर कारवाई करावी. तसेच या व्यावसायीकांना पाठीशी घालणार्‍यांचा शोध घेउन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस संदीप लोणकर (BJP Sandeep Lonkar) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune PMC News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये गाई, म्हशींसारखी गुरे पाळणार्‍यांना महापालिकेने केशवनगर येथील महापालिकेच्या जागेमध्ये गोठ्यांसाठी जागा देउन त्यांचे पुनर्वसन केले आहे. याठिकाणी अनेक गोठे मालकांनी जागा घेतली आहे. परंतू गेल्या काही वर्षांपासून याठिकाणचे बहुतांश गोठे बंद झाले असून त्याठिकाणी पक्के बांधकाम करून अन्य व्यवसायच सुरू करण्यात आले आहेत. यामुळे महापालिकेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. गोठ्यांच्या नावाखाली काही मंडळींनी दलाली करून महापालिकेची जागा दुसर्‍यांच्या घशात घातल्या आहेत. यासाठी कागदोपत्री अथवा तात्पुरत्या स्वरुपात दुसर्‍याची गुर्‍हे आणून तसेच दुग्ध व्यवसायाचे बनावट पुरावे तयार करून गोठ्यांच्या जागा लाटल्या आहेत, असा आरोप लोणकर यांनी आयुक्त, आरोग्य विभाग आणि मालमत्ता विभागाला दिलेल्या निवेदनात केला आहे. (Pune PMC News)

जागा मिळविण्यासाठी कथित गोठे मालकांनी दिलेली कागदपत्रे, त्यांनी दाखविलेले पुरावे, जागा वाटप झालेल्यांच्या नावाची यादी आणि सध्या जागेचा वापर करत असलेल्यांच्या नावाची यादी याची तपासणी करावी. यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी. गोठ्यांच्या ठिकाणी अन्य व्यवसायांसाठी करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम काढावे. तसेच या गैरव्यवहारात त्यांना पाठीशी घालणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही लोणकर यांनी केली आहे.

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांच्या वतीने शहरातील गोठे धारकांचे पुरावे घेउनच केशवनगर येथे गोठे धारकांना जागा दिली आहे.
दहा गुरांमध्ये अडीच गुंठे जागा वाटप करण्यात आले आहे.
परंतू आता त्याठिकाणी पशु पालन व दुग्ध व्यवसायच होतो का याची तपासणी करण्यात आलेली नाही.
लवकरच याठिकाणी सर्वेक्षण करून पुढील कारवाई करण्यात येईल.

– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :-  Pune PMC News | Illegal commercial use of the land given for cows in Keshavnagar A flurry of brokers who get seats based on bogus evidence

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | दिल्लीत दाखल होताच मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती, म्हणाले…

Pune Crime | MPSC च्या गट क सेवा मुख्य परीक्षेत पुण्यात गैरप्रकार, ब्ल्यूटूथ इयरफोन जप्त; उमेदवारावर FIR

Kolhapur ACB Trap | पुण्यातील शेतकऱ्याकडे एक कोटीची लाच मागणारा पोलीस गोत्यात, एसीबीकडून FIR; पोलीस दलात प्रचंड खळबळ

Related Posts