IMPIMP

Pune PMC News | माननीयांच्या ताब्यात असलेला महापालिकेचा योगा हॉल त्रयस्थ संस्थेला परस्पर भाड्याने दिल्याचा प्रकार उघडकीस; मनपाने वास्तुला ठोकले टाळे

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration's request to L&T (L&T) company, which has been digging for 24 hours water supply scheme in the last 2 years?

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | माननियांकडून महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) माध्यमातून
बांधण्यात आलेल्या वास्तू परस्पर भाड्याने दिल्या जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पीटल (Dalvi
Hospital, Shivaji Nagar, Pune) जवळ उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या वास्तुतील योगा हॉल (Yoga Hall) परस्पर एका संस्थेला भाडेतत्वावर
दिल्याचे उघडकीस आल्यानंतर मालमत्ता व्यवस्थापन विभागाने कडक पावले उचलली आहेत. हा हॉल ताब्यात घेउन तो योगा वर्ग घेणार्‍या संबधित
संस्थेला भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. (Pune PMC News)

 

माहिती अशी की महापालिकेने दळवी हॉस्पीटल शेजारी व्यायामशाळेसाठी दोन हॉल बांधले आहेत. २००३ मध्ये बांधण्यात आलेले हे हॉल २००७ मध्ये पाच वर्षांसाठी एका माननीयांच्या संस्थेला व्यायामशाळेसाठी देण्यात आले होते. २०११ मध्ये हा करार संपला. परंतू संबधित संस्थेने दोनपैकी एकाच हॉलमध्ये व्यायामशाळा सुरू करत दुसरा हॉल परस्पर योगा क्लासेस घेणार्‍या खाजगी संस्थेला दिला. या संस्थेकडून दरमहा भाडे देखिल आकारणी करण्यात येत होती. (Pune PMC News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, महापालिकेने काही महिन्यांपासून महापालिकेच्या मिळकतींचे ऑडीट करण्यास सुरूवात केल्यापासून ही बाब समोर आली. या मिळकतीच्या भाड्याची सुमारे २७ लाख थकबाकी होती.मालमत्ता व्यवस्थापन विभागाने येथील दोन्ही हॉलला टाळे लावले. यानंतर योगा क्लासेस घेणार्‍या संस्थेच्या संचालकांनी मालमत्ता व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधत संबधित हॉलचे भाडे माननीयांच्या संस्थेला देत असल्याचे सांगितले. तसेच तांत्रिक प्रक्रिया राबवून हा हॉल त्यांच्या संस्थेला भाडेतत्वावर मिळावा, अशी मागणी देखिल केली. २०१९ मध्ये मालमत्ता व्यवस्थापन विभागाने क्रिडा विभागाच्या ताब्यात ही वास्तू दिली आहे. प्रशासनाने या हॉलचे मुल्यांकन केले असून १ लाख २३ हजार रुपये मासिक भाडे मिळू शकणार आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune PMC News | It has been revealed that the Yoga Hall of the Municipal Corporation, which is in the possession of the Hon’ble, has been rented out to a third party; The mind avoids hitting the architecture

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दणका ! कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

Deepali Sayed | ‘मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का ?’ – दीपाली सय्यद

Poona Merchants Chamber Chamber On GST | अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5 % GST लागू होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर राज्यव्यापी परिषदेत 250 पदाधिकार्‍यांचा सहभाग

 

Related Posts