IMPIMP

Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

by nagesh
 Pune Garbage Depots Uruli Devachi - Fursungi | Transformation of Uruli Devachi-Fursungi Garbage Depot in last 20 years! To be developed as a tourist destination for scholars; Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | बांधकामांसाठी अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देताना आकारण्यात येणारे फायर
इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस पाठोपाठ फायर प्रिमियम चार्जेस बंद झाल्याने सक्षम अग्निशमन सेवा देणे अवघड जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका
आयुक्तांच्या अधिकारामध्ये अग्निशमन सेवा फीमध्ये वाढ करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव अग्निशामक दलाने मान्यतेसाठी स्थायी
समितीपुढे ठेवला आहे. (Pune PMC News)

 

शहरातील बांधकामांना अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र देताना इमारतींची उंची आणि वापरानुसार अग्निशामक दल फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, फायर प्रिमिअम चार्जेस तसेच सेवा शुल्क आकारत असे. परंतू यापैकी सेवा शुल्क वगळता अन्य दोन्ही चार्जेस बंद करण्यात आले आहे. तसेच अनेक वर्षात सेवा शुल्कात वाढ केली नसल्याने अग्निशामक दलाकडून मिळणारे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण कैकपटीने वाढले आहे. फायर प्रिमिअम चार्जेस रद्द करू नये यासाठी प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्याला यश न आल्याने प्रशासनाने महापालिका आयुक्तांच्या अधिकारामध्ये सेवा शुल्क वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाच्या मंजुरी मिळेपर्यंत नवीन दराने आकारणी करण्यात येईल. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शासनाच्या मंजुरीनंतर सेवा शुल्काचा दर कमी झाल्यास अधिकची रक्कम बांधकाम विभागास भरावयाच्या
रकमेमध्ये समायोजीत करण्यास आणि दरवाढ झाल्यास वाढीव रक्कम तत्काळ भरणार अशा आशयाचे
हमीपत्र विकसकाकडून लिहून घेण्याबाबतही प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Proposal for increase in fire service fee before Standing Committee for approval pune municipal corporation pmc news

 

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणे यांचा सातारा पोलिसांना इशारा, म्हणाले- “माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका, नाहीतर…”

Sandeep Karanje | सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार

Sushma Andhare | वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र – सुषमा अंधारे

 

Related Posts