IMPIMP

BJP MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणे यांचा सातारा पोलिसांना इशारा, म्हणाले- “माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका, नाहीतर…”

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | nitesh ranes letter to jitendra awha ajit pawar was also targeted

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – साताऱ्यातील पाटण तालुक्यात मंगळवारी ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ झाला. या मोर्चामध्ये भाजप आमदार नीतेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी सहभाग घेतला होता. या वेळी नितेश राणे यांनी सातारा पोलीसांनाच (Satara Police) आव्हान दिले. ‘परत परत सांगायला लावू नका, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालेल आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. लोकांच्या उपस्थिती सांगतोय, काही होत नाही. खूप एसपी, बिसपी खूप पाहिले. माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका,’ असा दम नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी पोलीसांना दिला आहे.

 

‘आम्हाला परवानगी बद्दल विचारात बसायचं नाही. आम्हाला पाहिजे तिथे मोर्चा काढणार,
आम्हाला पाहिजे तेव्हा मोर्चा काढणार, पाहिजे तेव्हा घरी जाणार. आम्हा लोकांना विचारायचं नाही.
इथून सांगून जातो, परत परत सांगायला लावू नका, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालेल आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. लोकांच्या उपस्थिती सांगतोय, काही होत नाही. खूप एसपी, बिसपी पाहिले आहेत. पण राजकारणात काही होत नाही. उगाच आम्हाला हिंमत दाखवायची नाही, जर पकडायच असेल तर त्या अनधिकृत धंदेवाल्यांना पकडा, तुम्हा जे काही मेडल हवे आहे, ते आम्ही सरकारमधून मिळवून देऊ. पण उगाची सिंघमगिरी माझ्यासमोर करू नका, असा दम नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सातारा पोलिसांना भरला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यक्रमात नितेश राणे भलतेच आक्रमक दिसले.
कुणीही आमच्या बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर हात पाय नाही डोळे जागेवर असता कामा नये,
आता सरकार भाजपचं आहे. आता इथं नवाब मलिक (Nawab Malik) किंवा
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही, अशी टीका त्यांनी केली.

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | then i will come to the police station bjp mla nitesh rane threatened the satara police

 

हे देखील वाचा :

Sandeep Karanje | सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार

Sushma Andhare | वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र – सुषमा अंधारे

Vedamurthy Pandav | ‘2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि उद्धव ठाकरे…’ – वेदमूर्ती पांडव यांची भविष्यवाणी

 

Related Posts