IMPIMP

Sandeep Karanje | सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

by nagesh
Sandeep Karanje | sandeep karanje as additional commissioner of solapur municipal corporation

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्तपदी (Additional Commissioner) संदीप कारंजे (Sandeep Karanje) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर (Deputy Secretary Anirudh Jevlikar) यांच्या सहीने प्रसिद्ध झाला. नगर विकास विभागाच्या निवड समितीने काही दिवसांपूर्वी व्हीसीद्वारे नगर अभियंता संदीप कारंजे (Sandeep Karanje) यांची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांच्याकडून घेतली होती. त्यानंतर कारंजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

महाराष्ट्र शासनाने सोलापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार रिक्त असलेल्या स्थानिक अधिकाऱ्यांतून अतिरिक्त आयुक्त पदासाठी माहिती मागवली होती. त्यानुसार महापालिकेकडून कारंजे (Sandeep Karanje) यांची माहिती तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांनी पाठवली होती. त्यानंतर निवड समितीने शिक्कामोर्तंब केल्यावर बुधवारी संदीप कारंजे यांना अतिरिक्त आयुक्त केल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोण आहेत संदीप कारंजे?

1995 साली कारंजे हे सोलापूर महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले होते.
2005 साली ते सहायक अभियंता झाले, तर 2018 साली त्यांच्यावर पदोन्नतीने नगर अभियंता या
महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. चांगल्या सेवेबद्दल त्यांना यापूर्वी उत्कृष्ट अभियंता
पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता ते महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.

 

 

Web Title :- Sandeep Karanje | sandeep karanje as additional commissioner of solapur municipal corporation

 

हे देखील वाचा :

CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार

Sushma Andhare | वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र – सुषमा अंधारे

Nagpur ACB Trap on PSI | 2 लाख रुपये लाच घेताना आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts