IMPIMP

Pune PMC News | वाघोली ते लोहगाव दरम्यानच्या रिंग रोडचे काम पुणे मनपा करणार; नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने उचलले पाउल

by nagesh
Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune PMC News | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीत नगर रस्त्यावरून वाघोली ते लोहगाव (Wagholi To Lohegaon) येथून पिंपरी चिंचवडला (Pimpri Chinchwad) जोडणार्‍या सुमारे ५.७ कि.मी. रिंग रोड आणि सर्व्हिस रस्त्याचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे २१२ कोटी रुपये खर्च येणार असून या खर्चाला इस्टीमेट कमिटीने मान्यता देखिल दिली आहे. या रस्त्यामुळे नगर रस्त्यावरून येरवडा मार्गे पिंपरी चिंचवड (Yerwada Via Pimpri Chinchwad), मुंबईकडे (Mumbai) जाणार्‍या वाहनांना शहरात यावे लागणार नसल्याने वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी व्यक्त केला आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागातून रिंग रोड (Pune Ring Road) प्रस्तावित आहे. या रस्त्यासाठीचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. ६५ मी. रुंदीच्या या रस्त्याचा काही भाग हा वाघोली येथून लोहगावमधून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जातो. नगर रस्त्यावरील वडगाव शेरी, खराडी (Kharadi), येरवडा परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रिंग रोड फायदेशीर ठरणार आहे. महापालिकेने हा रस्ता करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार सल्लागाराकडून अहवाल तयार करून घेतला असून मंगळवारी झालेल्या एस्टीमेट कमिटीमध्ये मान्यताही देण्यात आली आहे.

 

हा रस्ता ६५ मी. रुंद असेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हीस रस्ते असतील. तसेच पावसाळी गटारे आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सिग्नल्सची व्यवस्थाही असेल. या कामासाठी २१२ कोटी रुपये खर्च असून पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

शहरातील ५७ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २१७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या रस्त्यांच्या खर्चाला इस्टीमेट कमिटीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
यासोबतच शहरातील ६० चौक आणि दुभाजकांचे बीओटी तत्वावर सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
सुशोभिकरण आणि सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींची रंगरंगोटी करण्याची तयारी दर्शविलेल्या शहरातील उद्योजक आणि व्यावसायीकांसोबत आज बैठक घेण्यात आली.
चौक आणि दुभाजकांवरील सुशोभिकरणासोबतच लगतच्या भागात सामाजिक संदेश देणारे म्युरल्स व
अन्य बाबींची कामे देखिल करण्याची तयारी तसेच पुढील ३ ते ५ वर्षे मेन्टेनन्स करण्याची तयारी देखिल
या व्यावसायीकांनी दर्शविल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation will work on ring road between Wagholi and Lohgaon; Municipal Corporation has taken steps to solve the traffic congestion on city roads

 

हे देखील वाचा :

Bappi Lahiri Song | चीनमध्ये लॉकडाऊनला विरोध; बप्पी लहरी यांचं ‘हे’ गाणं वाजवून करतायत निषेध

MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

Sambhaji Bhide | ‘आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो’, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य, महिला आयोगाने घेतली दखल

 

Related Posts