IMPIMP

Sambhaji Bhide | ‘आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो’, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य, महिला आयोगाने घेतली दखल

by nagesh
 Sambhaji Bhide | maharashtra womens commission rupali chakankar send notice sambhaji bhide women journalist controversy statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. आज संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एका महिला पत्रकाराने (Women Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझाशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले. भिडे यांच्या या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) दखल घेतली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्ल्याने मुलं होतात’ असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथपर्यंत पोहोचली आहे. टिकलीवरुन महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचे आहे, असे चाकणकर म्हणाल्या.

 

ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे.
महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल.
त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले संभाजी भिडे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी यांना एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकारने प्रश्न विचारला.
तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली? यावर ‘तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन.
प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे’, असे विधान भिडे यांनी केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sambhaji Bhide | maharashtra womens commission rupali chakankar send notice sambhaji bhide women journalist controversy statement

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | पाकिस्तानला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर

Pathan Movie Teaser | बहुचर्चित पठाण चित्रपटाचा टीझर आऊट; वाढदिवसानिमित्त शाहरुख खानने दिले चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट (VIDEO)

Rapper Takeoff | ‘या’ प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या, कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क

 

Related Posts