IMPIMP

Pune PMC News | उरूळी देवाची कचरा डेपोतील प्रक्रिया प्रकल्पाच्या छतांवर ‘सौर उर्जा निर्मिती’; एनजीटीच्या आदेशानुसार महापालिकेने 100 किलो वॅट वीज निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया राबविली

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune PMC News | उरूळी देवाची (Uruli Devachi) येथील महापालिकेच्या कचरा डेपोच्या (PMC Waste
Depot) आवारातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतावर सौर उर्जा निर्मिती (Solar Energy) केली जाणार आहे. येथील प्रकल्पांच्या छतावर १०० किलो
वॅट उर्जानिर्मिती होईल अशा पद्धतीने सोलर पॅनल बसविण्यात येणार असून यातून निर्माण होणारी वीज परिसरातील पथदिवे, वॉटर पंप तसेच
ईलेक्ट्रॉनीक वजन काट्यासाठी वापरण्यात येणार आहे. या कामासाठी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
(Pune PMC News)

 

उरूळी देवाची येथील कचरा डेपो आणि प्रकल्प बर्‍याच समस्यांमुळे मागील २५ वर्षांपासून चर्चेत आहे. यासंदर्भात हरित लवादामध्येही केसेस झाल्या असून एका केसमध्ये लवादाने महापालिकेला दोन कोटी रुपये सॉल्व्हन्सी भरण्याचे आदेश दिले होते. यापुढे जावून या रकमेतून कचरा डेपो परिसरात पर्यावरण पूरक कामे करण्याचेही लवादाच्या आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने कचर्‍यापासून निर्माण होणारे लिचेड वाहून नेण्यासाठी गटारे बांधली आहेत. तसेच कचरा डेपोच्या रॅम्पवर तसेच उर्वरीत जागेवर मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. उरलेल्या ५० ते ५५ लाख रुपये खर्चातून कचरा डेपोच्या आवारात प्रक्रिया प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या मोठ्या शेडस्वर सोलर पॅनल बसवून सौर उर्जा निर्माण केली जाणार आहे. यासाठीच महापालिकेने निविदा प्रक्रिया (PMC Tender Process) राबविली आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या याठिकाणचा प्रक्रिया प्रकल्प भूमी ग्रीन या कंपनीकडून चालविण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या शेडवर हे सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत.
याठिकाणी निर्माण होणारी उर्जा नेट मिटरींगच्या माध्यमातून महापारेषणला देण्यात येणार आहे.
कचरा डेपोच्या आवारातील पथदिवे, वजन काटा, तसेच पंप हाउसच्या मोटारी, सीसीटीव्ही यंत्रणा चालविली जाणार आहे.
सध्याच्या गरजेपेक्षा अधिक वीज उत्पादन होणार असल्याने अतिरिक्त वीज विकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे उरूळी देवाची येथील कचरा डेपोसाठीचा विजेचा खर्च शून्यावर येणार असून
उलट महापालिकेला अतिरिक्त वीज विक्रीतून पैेसे मिळतील, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

 

Web Title :- Pune PMC News | ‘Solar power generation’ on roofs of treatment plant at Uruli Deva’s waste depot; According to the order of NGT, the Municipal Corporation conducted the tender process for generating 100 kilowatts of electricity

 

हे देखील वाचा :

Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, CID चौकशीचे आदेश

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल – पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

 

Related Posts