IMPIMP

Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, CID चौकशीचे आदेश

by nagesh
Vinayak Mete Accident Case | cid get proof against driver in vinayak mete accident death case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसंग्राम पक्षाचे नेते (Shiv Sangram President) विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचा पुणे-मुंबई
हायवेवर (Pune-Mumbai Express Highway) अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त करत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले
आहेत. विनायक मेटे यांचं अपघाती निधनानंतर (Vinayak Mete Death) त्यांच्या समर्थकांसोबतच कुटुंबीयांकडूनही या प्रकरणाची चौकशीची मागणी
करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने (State Government) घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath
Shinde) यांच्याकडून पोलीस महासंचालकांना (DGP) या प्रकरणाची चौकशी सीआयडी (CID Inquiry) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.

 

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. मराठा समाजाचे नेते (Maratha community Leader) अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम. जी. एम. रुग्णालयात (M.G.M. Hospital) जाऊन त्यांची भेट घेतली होती.
त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.
त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title : –  Vinayak Mete Death | vinayak mete accident death case cm eknath shinde order cid inquiry

 

हे देखील वाचा :

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल – पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

Ajit Pawar | सिंचन घोटाळाप्रकरणात अजित पवारांवर कारवाईची टांगती तलवार?, क्लीन चिटचा अहवाल अद्याप हाय कोर्टात प्रलंबित

Related Posts