IMPIMP

Pune PMC Water Supply News | गुरुवारी पुणे शहराला नियमित पाणीपुरवठा होणार, पाणी पुरवठा बंदचा निर्णय मागे

by sachinsitapure
Pune PMC Water Supply News | Regular water supply to Pune city on Thursday, decision to stop water supply reversed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Water Supply News | गुरुवारी (दि.10) अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) सांगितले होते. मात्र, आता गुरुवारी नियमितपणे सुरळीत पाणीपुरवठा  होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंत्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने पर्वती सबस्टेश येथे 220/22KV चे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि.10) करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्वती जलकेंद्र Parvati Water Center (जुने व नवीन) व अखत्यारीतील लष्कर जलकेंद्र, एन.एन.डी.टी. MLR (SNDT MLR) पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारी या पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे निवदेन पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागकडून देण्यात आले होते. मात्र, आता गुरुवारी नियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.

पुणे महापालिकेने राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या पर्वती सब स्टेशन येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
या चर्चेनंतर पुणे महापालिकेने गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
त्यामुळे गुरुवारी सर्व पेंपिंग स्टेशनवरील भागाचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरळीत सुरु राहणार असल्याची
माहिती पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Web Title : Pune PMC Water Supply News | Regular water supply to Pune city on Thursday,
decision to stop water supply reversed

Related Posts