IMPIMP

Pune Police News | पोलिसांच्या कामगिरीचे ‘शिव सन्मान पुरस्कार’ देऊन कौतुक, केशवनगर-मुंढवा रहिवाश्यांकडून आगळा वेगळा उपक्रम

by sachinsitapure
Pune Police News | Appreciation of police performance by giving 'Shiva Samman Award', another different activity by Keshavnagar-Mundhwa residents 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) भागातील नागरिकांनी पोलिसांना ‘शिव सन्मान’ पुरस्कार (Shiv Samman Award) देऊन सन्मानित केले. (Pune Police News) मुंढवा पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मुंढवा परिसरातील गुंडगिरी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Pune Police News) हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची उकल करून गुन्हे उघडकीस आणले. मोर्चा आंदोलन तसेच कायदा-सुव्यवस्था (Law and order) व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून तत्पर सेवा मिळत आहे. तसेच परिसरात राहण्यास आलेल्या गुन्हेगारांना नियमित चेक करुन त्यांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. यामुळे मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडगिरी मोडीत निघाली आहे. कर्तव्य बजावित असताना होत असलेल्या चांगल्या कामाचे केशवनगर-मुंढवा ग्रामस्थांनी कौतूक करुन पोलिसांना शिव सन्मान पुरस्कार दिला आहे.

या कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे
(Sr PI Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade) यांच्यासह
केशवनगर-मुंढवा परिसरातील 20-25 ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिसा आयुक्तांनी पुरस्कार मिळालेल्या
पोलिसांचे कौतुक करुन नियमित चांगली कमगिरी करीत रहवे, त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावत जाईल,
असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले. तसेच चांगला व कौतुकास्पद उपक्रम राबविल्याबद्दल
नागरिकांचे आभार मानले.

पुरस्काराचे मानकरी

सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे (API Sameer Karpe), संदीप जोरे (API Sandeep Jore),
पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे (PSI Dhananjay Gade), पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, दिनेश राणे,
वैभव मोरे, राहूल मोरे, सचिन पाटील, स्वप्निल रासकर, तानाजी देशमुख

Web Title : Pune Police News | Appreciation of police performance by giving ‘Shiva Samman Award’, another different activity by Keshavnagar-Mundhwa residents

 

Related Posts