IMPIMP

Pune Police Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्हयातून तडीपार

by nagesh
Pune Police Crime News | Vimannagar Police Station - Criminal Banned from District for 2 Years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Police Crime News | विमाननगर, कलवड वस्ती (Kalwad Wasti), संजय पार्क (Sanjay Park) परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणार्‍या सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्हयातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. राहुल भीमराव त्रिभुवन Rahul Bhimrao Tribhuvan (22, रा. संजयपार्क झोपडपट्टी, न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे – New Airport Road Pune) असे त्याचे नाव आहे. (Pune Police Crime News)

 

राहुल त्रिभुवन हा विमाननगर, कलवड वस्ती, संजय पार्क भागात दहशत निर्माण करून लोकांना त्रास देत होता. त्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होत होते. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे (Sr PI Vilas Sonde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी (PI Sangeeta Mali) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शांतमल कोळ्ळुरे (Shantamal Kollure), पोलिस हवालदार उमेश धेंडे, महिला पोलिस अंमलदार स्वाती चौधरी यांनी राहूल त्रिभुवन याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना पाठविला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रस्तावाची छाननी करून पोलिस आयुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी प्रस्ताव मंजुर करून राहुल त्रिभुवन याला पुणे जिल्हयातून 2 वर्षाकरिता तडीपार केले आहे. अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Police Crime News | Vimannagar Police Station – Criminal Banned from District for 2 Years

 

हे देखील वाचा :

Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ संघटनेच्या वतीने सोमवारी ईद मिलन

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई

Yashaswini Sanman Award | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता 12 मे पर्यंत अर्ज करता येतील; खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Maharashtra Govt Announcement | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

 

Related Posts