IMPIMP

Pune Police MCOCA Action | कोंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या गणेश लोंढे व त्याच्या 6 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 91 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MCOCA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | हॉटेल मॅनेजर व कामगारांवर धारदार हत्याराने वार करुन परिसरात दहशत निर्माण करणारा कोंढवा येथील सराईत गुन्हेगार गणेश बबन लोंढे याच्यासह त्याच्या इतर 6 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 91 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 307, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police MCOCA Action) पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन टोळी प्रमुख गणेश बबन लोंढे (वय-23 रा. साठे चौक, महंमदवाडी), विशाल माधव गोरे (वय-20 रा. तरवडे वस्ती, पुणे), मयुर माणिक पुरकास्त (वय-18 रा. कृष्णानगर, पुणे), ऋषीकेश विठ्ठल घाडगे (वय-20 रा. तरवडे वस्ती, पुणे), शुभम नंदु चव्हाण (वय-19 रा. मोहंमदवाडी, पुणे) यांना अटक करुन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

टोळी प्रमुख गणेश लोंढे याने गुन्हेगारांची टोळी तयार केली. या टोळीने मागील 10 वर्षात खुनाचा प्रयत्न, चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, दरोड्याची तयारी, दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे (Pune Crime News) केले आहेत. आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात शरीरा विरुद्धचे व माला विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस
आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास वानवडी विभागाचे
(Wanwadi Division) सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे (ACP Shahuraje Salve) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosale), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle),
सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, गणेश तोरगल, पोलीस उपनिरीक्षक इकबाल शेख,
पोलीस अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे.

Related Posts