IMPIMP

Pune Politics – PMC Elections | राष्ट्रवादीच्या एंट्रीने आठवलेंच्या रिपाइंमध्ये अस्वस्थता? महापालिका निवडणुकीत संधी मिळणार का ? याभितीने रिपाइंचे इच्छुक चिंतेत

by nagesh
Pune Politics – PMC Elections | NCP’s entry uneasiness in Athawale’s RPI? Will there be a chance in the municipal elections? Aspirants of Repay are worried about this

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Politics – PMC Elections | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत गेल्याने पुणे शहरात रिपाइंच्या आठवले गटाची Republican Party of India (Athawale) निर्णयकी अवस्था झाली आहे. मागील सहा वर्षे महापालिकेत भाजपसोबत सत्तेची फळे चाखल्याने महागाई, बेरोजगारी आणि गरिबांच्या प्रश्नावर आक्रमकता हरवलेल्या रिपाइंला आगामी महापालिका निवडणुकीत नव्या महायुती मध्ये काय स्थान असेल ? याची चिंता लागून राहिली आहे. (Pune Politics – PMC Elections)

शहरात काही भागात रिपाइं ला मानणारा वर्ग आहे. प्रामुख्याने 42 टक्के लोकसंख्या राहात असलेल्या झोपडपट्टी भागात रिपाइं मतदारांची संख्या नजरेत भरण्याइतपत आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मागील दशकभरात रिपाइं भाजप शिवसेना (Shivsena) युतीमध्ये आहे. परंतु स्थानिक पातळीवर 2017 च्या महापालिका निवडणुकीत रिपाइंला RPI (Athawale Group)चांगला फायदा झाला. भाजप सोबतच्या युतीमध्ये भाजपच्याच कमळ या चिन्हावर रिपाइं चे पाच नगरसेवक विजयी झाले. यानंतरही महापौरांच्या अधिकारात स्वतंत्र गट म्हणूनही मान्यता मिळाली. यापैकी एक नगरसेविका वगळता तीन जणांना उपमहापौर, तीन जणांना गटनेता आणि स्थायी समिती सदस्यपद मिळाले. (Pune Politics – PMC Elections)

93 नगरसेवक असलेल्या भाजपमध्ये मात्र 2 जणांना महापौर,
चार जणांना स्थायी समिती अध्यक्ष आणि तीन जणांना सभागृह नेतेपदी संधी मिळाली.
वरकरणी पाहता रिपाइं च्या ‘पाचों उंगलीया घी में ‘ अशी चंगळ राहिली. परंतु या सर्व नगरसेवकांचे लक्ष हे केवळ प्रभागा पुरतेच राहिले. सत्ताकाळात संघटनेमध्ये वाद धुमसत राहिला. त्यामुळे केवळ मश्गुल राहिलेले रिपाईची किंमत भाजपच्या दृष्टीने प्रचारातील ‘ निळ्या झेंड्या ‘ पुरतीच राहिली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नव्या समीकरणात भाजपसोबत आता शिंदे यांची शिवसेना आणि एकेकाळी पुण्याचे किल्लेदार आणि प्रमुख विरोधीपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री झाल्याने भाजपचे नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये आधीच धडकी भरली आहे. त्यातही 2017 ला राष्ट्रवादी व अन्य पक्षातून मधून भाजप मध्ये आलेल्याचा भरणा अधिक आहे. तर ईछुकांमध्ये मागील 9 वर्षे भाजपची ध्येय धोरणे आक्रमकपणे मांडुन नगरसेवक पदाची स्वप्न पाहणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्वांचे पाहुन रिपाइंला किती तिकिटे द्यायची हा प्रश्न भाजप नेतृत्वाकडून उपस्थित केला जाऊ शकतो, याची साधारण कल्पना रिपाइंला आलेली आहे. प्रामुख्याने वरच्या फळीतील धाकधूक यामुळे वाढल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जाऊ लागले आहे.

Web Title : Pune Politics – PMC Elections | NCP’s entry uneasiness in Athawale’s RPI? Will there be a chance in the municipal elections? Aspirants of Repay are worried about this

Related Posts