IMPIMP

Pune Rain | पुण्यात अतिवृष्टीचा इशारा ! पुण्यातील सर्व शाळांना एक दिवस सुट्टी जाहीर

by nagesh
Pune Rains | Holidays For 3 Days Declared In All Schools Of Pune District Except 5 Talukas Collector Dr. Rajesh Deshmukh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Rain | पुणे शहर आणि परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Pune Rain) पडत आहे. हवामान खात्याने (IMD) गुरुवारी (दि.14) अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain) दिल्याने उद्या (गुरुवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर (Schools Closed) करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) शिक्षण विभागाने (Education Department) हा निर्णय घेतला आहे.

 

पुणे शहरात पडत असलेल्या पावसामुळे (Pune Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतुक कोंडी (Traffic Jam) मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. अशी स्थिती असताना हवामान खात्याने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना अनेक समस्या येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी वेळ लागत आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टमुळे (Red Alert) पुणे महापालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक (Primary),
माध्यमिक (Secondary),
सर्व मनपा तसेच सर्व खाजगी शाळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित)
गुरुवार (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश पुणे महापालिका प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग (प्राथमिक) (Administrative Officer Education Department (Primary) डॉ. मिनाक्षी राऊत (Dr. Minakshi Raut)
व शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण पोपट काळे (Education Officer Secondary and Technical Education Popat Kale) यांनी दिले आहेत.

 

 

Web Title :- Pune Rain | Warning of heavy rains in Pune One day holiday declared for all schools in Pune

 

हे देखील वाचा :

Diabetes Symptoms | टाईप 2 डायबिटीजचा संकेत आहेत ‘हे’ असामान्य लक्षण, तुमच्यात तर दिसत नाही ना?

CM Eknath Shinde | ‘त्या’ शिवसैनिकाच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले

Pune Rain | पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ! पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

 

Related Posts