IMPIMP

Pune Rains | पुणे शहर आणि परिसरात पुन्हा हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज; जाणून घ्या राज्यातील पावसाचा अंदाज

by nagesh
Maharashtra Rains Update | weather report vidarbha gadchiroli konkan marathawada maharashtra rain updates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Rains | दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. लक्षद्विप (Lakshadweep) आणि कर्नाटक किनारपट्टी (Karnataka coast) परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची (Rain in Maharashtra) स्थिती निर्माण झाली होती. पुणे आणि परिसरात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र रविवार पासून पावासने उघडीप घेतली असली तरी पुढील दोन दिवासानंतर पुणे शहर (Pune Rains) आणि परिसरात पुन्हा हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने IMD (India Meteorological Department) वर्तवला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे शहरामध्ये सोमवारी (दि.8) 15.8 अंश सेल्सिअस इतके किमान तर 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ (temperature Increase) झाली होती. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात किमान तापमानात सातत्याने घट होत होती. परंतु नोव्हेंबरची सुरुवात होताच शहरात अंशत: ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान हे 18 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. परिणामी काहीसा उकडा जाणवू लगाला होता. मात्र आता पुन्हा अशीच स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

गुरुवारपासून (दि.12) पुणे शहरामध्ये आकाश अंशत: ढगाळ वातावरणाचे सावट राहणार आहे.
दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी (Pune Rains) पडू शकतात.
राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 11 नोव्हेंबरपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
सध्या अनेक भागात किमान आणि कमाल तापमनात चढ-उतार कायम असून काही भागात थंडीला सुरुवात झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

सध्या बंगालचा उपसागर आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून पुढील 24 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत ही प्रणाली उत्तर तामिळाडू किनारपट्टीच्या भागात प्रवास करेल. परिणामी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Pune Rains | india meteorological department rain alert in pune city and area Know the rainfall forecast in the maharashtra

 

हे देखील वाचा :

Mumbai Cruise Drugs Case | मुंबई पोलिसांच्या एसआयटी चौकशीत मोठा खुलासा; जाणून घ्या ड्रग्स प्रकरणात कशी झाली वसुली? ‘त्या’ सेल्फीमुळं पर्दाफाश

Swati Maliwal | धक्कादायक ! स्पा मसाजसाठी स्वाती मालीवालांनी पाठवला ‘फेक’ मेसेज, फोटोंसह 150 कॉलगर्ल्सची ‘रेट लिस्ट’च मिळाली

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपात भागीदारी देण्याच्या आमिषाने 1.16 कोटीची फसवणूक; अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द FIR

 

Related Posts