IMPIMP

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपात भागीदारी देण्याच्या आमिषाने 1.16 कोटीची फसवणूक; अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | बनावट नोटरी बनवून पेट्रोल पंपाच्या व्यवसायात १० टक्के भागीदारी देण्याचे दर्शवून एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी रवींद्र यादव मोहिते Ravindra Yadav Mohite (वय ६१, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरविंद पांडुरंग बरके (Arvind Pandurang Barke), गणेश पांडुरंग बरके (Ganesh Pandurang Barke) आणि नंदा अरविंद बरके Nanda Arvind Barke (सर्व रा. गृहलक्ष्मी सोसायटी, सोमवार पेठ – Somwar Peth) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र यादव मोहिते यांना पेट्रोल पंप व्यवसाय करायचा होता. आरोपी यांना या व्यवसायाची माहिती असल्याने त्यांनी फिर्यादी यांना वाडिया कॉलेज (wadia college pune) समोरील भारत पेट्रोल पंप (bharat petrol pump) विकत मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन (Pune Crime) केला. अरविंद व गणेश बरके यांनी त्यांच्या बँक खात्यावरुन जनता ऑटोमोबाइल्स व कांचन सरसी सेंटर, बॉम्बे गॅरेज या नावाने असलेल्या बँक खात्यात १ कोटी ११ लाख २० हजार रुपये आरटीजीएसने ट्रान्सफर करण्यास सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

फिर्यादी व आरोपी यांच्यात बनावट नोटरी बनवून फिर्यादी यांना १० टक्के भागिदारी दिल्याचे भासविले. या भागीदारीनुसार फिर्यादी यांची रक्कम भांडवलरुपी असेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्यास १ लाख रुपये जमा होतील, असे सांगून रक्कम जमा केली नाही. तसेच फिर्यादी यांच्या मुलाने आरोपींना ४ लाख ८० हजार रुपये वेळोवेळी पाठवून फिर्यादी यांना वाडिया कॉलेज समोरील भारत पेट्रोलियाम सेल्स कंपनीचा पेट्रोल पंप देण्यास टाळाटाळ करुन फिर्यादी (Pune Crime) यांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | 1.16 crore fraud lured to join petrol pump in Pune; FIR against Arvind Barke, Ganesh Barke and Nanda Barke

 

हे देखील वाचा :

Under2 Coalition | महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार, पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारे देशातील पहिले राज्य

Pune Crime | 16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’; आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’

Pune Crime | पुण्यात उच्चभ्रु सोसायटीतील सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’; बिबवेवाडी पोलिसांकडून 2 एजंट अटकेत

Eggs Protein Nutritionist | कोणत्या प्रकारचे अंडे फायदेशीर? ‘हे’ खाताना बहुतांश लोक करतात ‘ही’ चूक, जाणून घ्या कोणती

 

Related Posts