IMPIMP

Swati Maliwal | धक्कादायक ! स्पा मसाजसाठी स्वाती मालीवालांनी पाठवला ‘फेक’ मेसेज, फोटोंसह 150 कॉलगर्ल्सची ‘रेट लिस्ट’च मिळाली

by nagesh
Swati Maliwal | Chairperson, Delhi Commission for Women swati maliwal summons justdial investigate its role promoting prostitution rackets spas

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Swati Maliwal | आज सोशल मिडियाच्या काळात अनेक लोक चांगला वापर करताना दिसतात. तर अनेक लोक गैरवापर देखील करत असल्याचं समोर येतं. दरम्यान, सोशल मिडियाचा वापर सहजतेने अवैध धंदे करण्याचे ठिकाण देखील बनताना दिसत आहे. एकमेकांना जोडण्याचे काम करणाऱ्या सोशल मीडियाचा वापर हल्ली अवैध धंद्यांसाठी केला जातोय. याचाच एक पुरावा आता दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson, Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्या हाती लागला आहे. स्वाती मालीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

 

 

 

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना जस्टडायलवर (Justdial) स्पा मसाजसाठी (Spa Massage) माहिती मिळवायची होती.
त्यामुळे मालीवाल यांनी जस्टडायलवर मेसेज केला. त्यानंतर त्यांना 150 हून जादा कॉलगर्लचे रेट सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती स्वतः मालीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
”आम्ही जस्टडायलवर कॉल करून स्पा मसाजची खोटी चौकशी केली.
त्यानंतर आमच्या फोनवर असे 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे दर सांगण्यात आले.
मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) गुन्हे शाखेला समन्स जारी करत आहे.
या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?” असं ट्वीट स्वाती मालीवाल यांनी केलं आहे.

 

 

स्वाती मालीवाल यांनी सांगितलं आहे की, दिल्ली पोलिसांना (Delhi Police) या प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे.
जस्टडायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन.
दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेतले जाणार नाही, असं देखील मालीवाल यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Swati Maliwal | Chairperson, Delhi Commission for Women swati maliwal summons justdial investigate its role promoting prostitution rackets spas

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपात भागीदारी देण्याच्या आमिषाने 1.16 कोटीची फसवणूक; अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द FIR

Under2 Coalition | महाराष्ट्राला मिळाला जागतिक पुरस्कार, पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी कौतुक होणारे देशातील पहिले राज्य

Pune Crime | 16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’; आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’

 

Related Posts