IMPIMP

Pune Sahakar Nagar Crime | दुसर्‍या कंपनीला परस्पर माल विकून 32 लाखांचा घातला गंडा; 8 जणांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Sahakar Nagar Crime | कंपनीच्या मालाची होल्टास कंपनीला विक्री न करता परस्पर अन्य कंपन्यांना विक्री करुन त्यांच्याकडून पैसे घेऊन ते कंपनीकडे जमा न करता अधिकार्‍यांनी संगनमत करुन कंपनीला ३१ लाख ८४ हजार ७६९ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)

याप्रकरणी अशोक विठोबा वर्पे (वय ४७, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४६/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव कल्याण जगताप, राहुल अनिल सुलाखे, धनश्री माधव जगताप, प्रशांत जयराम जगताप, पुजा जगताप, मिनाक्षी कदम, धमेंद्र सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील इंदु सोसायटीतील सॉफ्टहार्ड आॅटोमेशन कंपनीत २०१८ ते २०२२ दरम्यान घडला (Pune Sahakar Nagar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सॉफ्टहार्ड ऑटोमेशन कंपनीत कमर्शियल हेड असून नोकरीला आहेत. आरोपी हे कंपनीत विविध पदावर काम करतात. त्यांनी आपसात संगनमत करुन सॉफ्टहार्ड ऑटोमेशन कंपनीचे मालाची होल्टास कंपनीला विक्री न करता हा माल अन्य कंपन्यांना परस्पर विक्री केला. विक्री करुन आलेल्या ३१ लाख ८४ हजार ७६९ रुपये कंपनीच्या खात्यावर न भरता या रक्कमेचा अपहार केला. तसेच मालाचा अपहार करुन कंपनीची आर्थिक फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक छबू बेरड तपास करीत आहेत.

Related Posts