IMPIMP

Pune Sinhagad Fort | ’16 जुलैपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवा’ – वन विभाग

by nagesh
Pune Sinhagad Fort | heady rainfall and rockfalls forest officer seeks temporary closure of sinhagad fort pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Sinhagad Fort | वाढत्या पावासाचा अंदाज पाहता आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या नऊ किलोमीटरच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ल्यावर (Pune Sinhagad Fort) येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती पुणे वनविभागाकडून (Pune Forest Department) करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला (District Administration) देण्यात आले आहे.

 

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.तसेच, पुणेकरांचा हक्काचा असलेला सिंहगड किल्यावर पावसाळ्यात आणि इतर ऋतूत देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या सिंहगडावर विकेंडला मोठी वाहतुक कोंडी बघायला मिळते. पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी दुप्पट असते. त्यामुळे अति प्रमाणात वाहतुक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागतो. याच सिंहगडावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडतात. त्यामुळे घाटावर अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. (Sinhagad Fort)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सुरक्षेची संपुर्ण काळजी घेतली जाते. पण, तरीही दरवर्षी दरड कोसळ्याच्या घटनेत सतत वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वनविभागाकडून काही दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान, गर्दी नियंत्रणासाठी 25 वनरक्षक तैनात केले आहे. पण, अनेकांना नियंत्रणात ठेवण्यात त्यांना त्रास होत आहे. सेल्फी घेण्यासाठी लोक धोकादायक ठिकाणी उभे असतात. त्यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. पर्यटकांनीही स्वतःची सुरक्षा बाळगायला हवी. गर्दी करु नये, सावध राहायला हवं. असं आवाहनही प्रशासनाकडून सतत केले जात आहे.

 

Web Title :- Pune Sinhagad Fort | heady rainfall and rockfalls forest officer seeks temporary closure of sinhagad fort pune

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | ‘सरकार बदललं म्हणून काय झालं ? मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही’ – रूपाली चाकणकर

Bone Pain | हाडांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो ‘हा’ भयंकर आजार

CM Eknath Shinde | गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचे खास ट्विट; म्हणाले…

 

Related Posts