IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या (Pune Water Supply) पर्वती जलकेंद्र पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, रामटेकडी जलकेंद्रातील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.07) संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.08) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पर्वती जल केंद्राच्या अखत्यारितील ‘एलएलआर’ टाकीची मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे. हे काम 6 जानेवारीला दुपारी 12 पासून 7 जानेवारीला दुपारी 12 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे या टाकीद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

 

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

वडगाव जलकेंद्र (Vadgaon Water Station) : (6 जानेवारी) नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.

 

पर्वती (LLR) जलशुद्धीकरण केंद्र (Parvati Water Treatment Plant) : (6 जानेवारी दुपारी 12 ते 7 जानेवारी दु. 12 पर्यंत) शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, भवानी पेठ, नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लष्कर जलकेंद्र (Lashkar Water Station) : (6 जानेवारी) जीई-साउथ, जीई-नॉर्थ, पुणे कॅन्टोमेंटचा हद्दीचा सर्व भाग,
जांभूळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशीर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर, काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर,
फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी,
घोरपडी गाव व परिसर, वानवडी गाव, बी.टी. कवडे रोड, उदय बाग, कवडे मळा, मगरपट्टा, हांडेवाडी रोड,
मंतरवाडी, सोलापूर रस्त्यावरील डोबरवाडी, सोपानबाग, तसेच उत्तरेला फातिमानगर, एस.व्ही नगर परिसर, सेंट पॅट्रिक्स टाउन आणि शेवकर वस्ती.

 

Web Title :- Pune Water Supply | No Water Supply In These Areas of Pune on Thursday: PMC

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission Updates | खुशखबर ! 32 लाख लोकांच्या अकाऊंटमध्ये 2 लाख रुपये टाकणार सरकार

Share Market | 2022 मध्ये कमावण्यासाठी ‘हे’ 10 शेयर, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Property Registration-Gunthewari | महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला ‘मुहूर्त’, सोमवार पासून गुंठेवारीची नोंदणी सुरु

 

Related Posts