IMPIMP

Punit Balan Celebrity League | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा ! तोरणा लायन्स्, सिंहगड स्ट्रायकर्स संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला

by nagesh
Punit Balan Celebrity League | Second 'Punit Balan Celebrity League' Cricket Tournament! Torna Lions, Sinhagad Strikers teams celebrated the opening day

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan Celebrity League | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेत तोरणा लायन्स् आणि सिंहगड स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्धघाटनाचा दिवस गाजवला. (Punit Balan Celebrity League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत माधव देवचाके आणि शिखर ठाकूर याच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर तोरणा लायन्स् संघाने रायगड पँथर्स संघाचा शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सनसनाटी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अजिंक्य जाधव याच्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर रायगड पँथर्सने १० षटकात ११९ धावांचे आव्हान उभे केले. सामन्यामध्ये पुनित बालन (२-१४) यांनी चमकदार गोलंदाजी केली. हे आव्हान तोरणा लायन्स्ने अखेरच्या षटकामध्ये गाठले. शेवटच्या दोन चेंडूवर ९ धावांची आवश्यकता असताना शिखर ठाकूर याने एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजयाचे दार खुले करून दिले. माधव देवचाके याने ३५ धावांचे योगदान दिले. (Punit Balan Celebrity League)

 

सिद्धार्थ जाधव याच्या ३२ धावांच्या जोरावर सिंहगड स्ट्रायकर्स संघाने शिवनेरी रॉयल्स् संघाचा ४८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सिंहगड स्ट्रायकर्स संघाने १० षटकात २ गडी गमावून ११४ धावा धावफलकावर लावल्या. कर्णधार सिद्धार्थ जाधव (३२ धावा) आणि तेजस नेरूरकर (नाबाद २६ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाच्या डावाला आकार मिळला. या आव्हानाचा पाठलाग करताना शिवनेरी रॉयल्स् संघाचा डाव ६६ धावांवर मर्यादित राहीला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्पर्धेचे उद्धघाटन पुणे शहर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) , माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) आणि पुनित बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन (Punit Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंहगड स्ट्रायकर्सचा कर्णधार सिद्धार्थ जाधव, शिवनेरी रॉयल्स्चा कर्णधार संदीप जुवाटकर, उपेंद्र लिमये, संजय नार्वेकर, संजय जाधव, प्रविण तरडे असे मराठी चित्रपटसृष्टी अनेक कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जाजू यांनी केले.

 

आपल्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये संदीप कर्णिक यांनी सांगितले की, नवीन वर्षाची सुरूवात अशी अनोख्या
आणि उत्साहपूर्ण क्रिकेट स्पर्धेने झाली आहे. आत्तापर्यंत विविध माध्यमांव्दारे मराठी चित्रपटसृष्टीतील हे
सर्वच कलावंत आपले मनोरंजन करत आहेत. आजपासून आता ४ दिवस या क्रिकेट स्पर्धेव्दारे मैदानावर उतरून
ते आपले मनोरंजन करणार आहेत. ही स्पर्धा सलग दुसर्‍या वर्षी पुण्यामध्ये आयोजित केल्यासाठी तसेच संपूर्ण
मराठी चित्रपटसृष्टी पुण्यामध्ये आणल्याबद्दल मी पुनित बालन आणि ग्रुप यांचे आभार मानतो.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

सिंहगड स्ट्रायकर्सः १० षटकात २ गडी बाद ११४ धावा (सिद्धार्थ जाधव ३२ (२६, २ चौकार, २ षटकार),
तेजस नेरूरकर नाबाद २६, सनीभुषण मुंगेकर १६, अभिजीत कवठाळकर १-१९) वि.वि. शिवनेरी रॉयल्स्ः १० षटकात
५ गडी बाद ६६ धावा (कृणाल पाटील २८ (२०, ३ चौकार), अमित सामेळ २-८, अशोक देसाई १-७); सामनावीरः
सिद्धार्थ जाधव;

रायगड पँथर्सः १० षटकात २ गडी बाद ११९ धावा (अजिंक्य जाधव नाबाद ५३ (२६, ५ चौकार, ३ षटकार),
गौरव देशमुख २९ (२०, ३ चौकार), देवेंद्र गायकवाड १५, पुनित बालन २-१४) पराभूत वि. तोरणा लायन्स्ः
१० षटकात २ गडी बाद १२१ धावा (माधव देवचाके ३५ (२२, २ चौकार, २ षटकार), शिखर ठाकूर २६
(१३, २ चौकार, २ षटकार), संजय जाधव १५, अजिंक्य जाधव १-२५); सामनावीरः माधव देवचाके;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Punit Balan Celebrity League | Second ‘Punit Balan Celebrity League’ Cricket Tournament! Torna Lions, Sinhagad Strikers teams celebrated the opening day

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | मंत्रीमंडळ विस्तारावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले; म्हणाल्या…

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर

Sourav Ganguly Statement | सचिन-विराटच्या तुलनेवरील वादावर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

 

Related Posts