IMPIMP

IND Vs AUS Tour | भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ जाहीर; दोन नवीन खेळाडूंना संघात स्थान

by nagesh
IND Vs AUS Tour | australian women team announced for india tour two new players included

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – IND Vs AUS Tour | भारत (India) दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया (Australia) महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात अ‍ॅलिसा हिली (alyssa healy) ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार आहे. मेग लॅनिंगने (Meg Lanning) ऑगस्टमध्ये क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅलिसा हिली हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर ताहलिया मॅकग्राकडे (Tahlia McGrath) संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. (IND Vs AUS Tour)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ऑस्ट्रेलियन महिला संघात अ‍ॅशले गार्डनर (Ashleigh Gardner), जेस जोनासेन (Jess Jonassen), निकोला केरी (Nicola Carey), डार्सी ब्राउन (Darcie Brown) आणि एलिस पेरी (Ellyse Perry) यांचाही समावेश आहे. तसेच किम गर्थ (Kim Garth) आणि फोबी लिचफील्ड (Phoebe Litchfiled) या दोन युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन संघ डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ते पाच टी-20 सामने खेळणार आहेत. या मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. हे सर्व सामने मुंबईत खेळवले जाणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचे वेळापत्रक
9 डिसेंबर: पहिला टी-20, डीवाय पाटील स्टेडियम (December 9: 1st T20I, DY Patil Stadium)
11 डिसेंबर: दुसरी टी-20, डीवाय पाटील स्टेडियम (December 11: 2nd T20, DY Patil Stadium)
14 डिसेंबर: तिसरा टी-20, ब्रेबॉर्न स्टेडियम (December 14: 3rd T20I, Brabourne Stadium)
17 डिसेंबर: चौथा टी-20, ब्रेबॉर्न स्टेडियम (December 17: 4th T20I, Brabourne Stadium)
20 डिसेंबर: पाचवा टी-20, ब्रेबॉर्न स्टेडियम (December 20: 5th T20I, Brabourne Stadium)

 

Web Title :- IND Vs AUS Tour | australian women team announced for india tour two new players included

 

हे देखील वाचा :

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने वाढदिवशी शेअर केली ‘हि’ खास पोस्ट; पोस्ट व्हायरल

Pune Crime | मुंढव्यात टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार करुन केली गाड्यांची तोडफड

Buldhana Crime | तरुणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव परिसरात खळबळ

 

Related Posts