IMPIMP

Ramdas Athawale on Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे… सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका वांदा’ – रामदास आठवले

by nagesh
Ramdas Athawale on Uddhav Thackeray | union minister ramdas athavales mischievous cirtcism on chief minister uddhav thackeray

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Ramdas Athawale on Uddhav Thackeray | सांगली जिल्ह्यातील (Sangli News) आटपाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पार पडला. त्यावेळी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आपल्या मिश्किल शब्दात टिपण्णी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रामदास आठवले म्हणाले की, ”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले असून, त्यांना मी अनेकवेळा त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते बाहेर पडत नसल्याने त्यांना फक्त एक सल्ला दिला आहे की, ‘तुम्ही त्या ठिकाणी सुखाने नांदा, पण होऊ देऊ नका तुमचा वांदा, ” अशा शब्दात आठवले यांनी टीका केली आहे. (Ramdas Athawale on Uddhav Thackeray)

 

”आमचा रिपब्लिकन पक्ष वाद न करणारा व जातीय तेढ निर्माण न करणारा सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र पुढे नेणारा पक्ष आहे. बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना रिपब्लिकन नावाचे वावडे आहे. मी ज्या पक्षासोबत राहतो, त्या पक्षाची सत्ता येते. शिवसेनेने (Shivsena) लोकमताचा अनादर करून सत्ता स्थापन केली.” असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.

 

दरम्यान, ”विनाकारण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करू नका. भोंगे काढण्याची भाषा करू नका.
संपूर्ण भारत देश अखंड सर्वधर्मसमभाव जपणारा आहे. भोंगा आवडत नसेल, तर ऐकू नका. संविधानाच्या विरोधात भूमिका योग्य नाही.” असं म्हणत राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीला आठवले यांनी विरोध केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ramdas Athawale on Uddhav Thackeray | union minister ramdas athavales mischievous cirtcism on chief minister uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut on Devendra Fadnavis | ‘मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको’ – संजय राऊत

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Yoga For Menstrual Cramps | ‘ही’ 3 योगासन तुम्हाला देतील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम; जाणून घ्या

 

Related Posts