IMPIMP

Ramdas Athawale | ‘शरद पवार यांनी कधीच जातीय राजकारण केलं नाही ते तर…’; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

by nagesh
Ramdas Athawale | rpi leader and central state minister ramdas athawale says ncp chief sharad pawar is not casteist he is secular

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ramdas Athawale | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या दोन सभांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ते जातीयवादी (Casteist) असल्याचं म्हटलं होतं. यावरून संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची पाठराखण केली आहे. (NCP chief Sharad Pawar is not casteist, he is secular – RPI leader Ramdas Athawale)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केलं नसून पवार हे धर्मनिरपेक्ष (Secular) असल्याचं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) मराठवाडा विद्यापीठ नामांतराची आठवण करून देत, नामांतराचं श्रेय हे पवारांचं असल्याचं आठवले म्हणाले.

 

शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर विद्यापीठ नामांतराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता.
मात्र जातीय दंगल उसळल्याने नामांतर हे लांबलं होतं.
त्यावेळी शरद पवार यांनी गैरसमज दूर करत विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) असं नामांतर केल्यांची आठवण रामदास आठवले यांनी सांगितली.

 

दरम्यान, शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं काय ?,
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयवाद वाढला असल्याची टीका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.

 

Web Title :- Ramdas Athawale | rpi leader and central state minister ramdas athawale says ncp chief sharad pawar is not casteist he is secular

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक

NCB Officer Amit Gawate | एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी अमित गवाटे

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

 

Related Posts