IMPIMP

Ravikant Varpe on Chandrakant Patil | ‘भाजपा आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी नाहीतर… – रविकांत वरपे

by nagesh
BJP Leader Joins NCP | bjp leader digvijay shinde joined ncp maharashtra mlc election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ravikant Varpe on Chandrakant Patil | सध्या राजकारणात अनेक कारणावरुन राजकीय वादंग निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, काल भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन (BJP Maharashtra Twitter Account) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविषयी एक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने (NCP) केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपला (BJP) कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच भाजपाने पवारांची माफी मागणी, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी एक पत्रक जारी केलं आहे. (Ravikant Varpe on Chandrakant Patil)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रविकांत वरपे यांनी पत्रकातून म्हटलं आहे की, ‘’शरद पवार यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करत आहेत. कित्येक हिंदू देवतांच्या मंदिरांचा पवार यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. पण महाराष्ट्रात काहीही करुन तेढ निर्माण करुन सत्तेसाठी हपापलेले भाजपाचे नेते पवारांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत,’’ अशी टीका त्यांनी केली. (Ravikant Varpe on Chandrakant Patil)

 

 

पुढे रविकांत वरपे म्हणाले, ”पवारांच्या भाषणातून एक छोटीशी क्लीप काढून हिंदू समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम भाजपा करत आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेतील पाथरवट या शब्दाला अर्थ असा आहे, की दगडाला आकार देणारा समाज, मूर्ती घडवूनही या समाजाला देवळात जाण्याचा अधिकार नाही. या व्यथा या कवितेतून मांडल्या आहेत. याचाचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला. मात्र भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना यातही जाती, धर्माचा तिरस्कार दिसला. यावरून भाजपाच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ”जाणीवपूर्वक हिंदू विरोधी प्रतिमा निर्माण करुन पवारांचा अपमान करणारे ट्विट भाजपाने केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. हे ट्विट आक्षेपार्ह आहे. ते भाजपाने ट्विटर हॅण्डलवरुन काढून टाकावे आणि चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पवारांची माफी मागितली नाही तर त्यांच्यासोबतच भाजपावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा वरपे यांनी दिला आहे.

Web Title : Ravikant Varpe on Chandrakant Patil | “BJP and Chandrakant Patil should apologize to Sharad Pawar” – Ravikant Warpe

 

हे देखील वाचा :

Pune Police | पोलीस कोठडीत आरोपीला मारहाण करणारा पोलीस अंमलदार निलंबित

Mumbai-Pune Express Highway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रेलरची टेम्पोला धडक; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts