रेखा जरे हत्याकांड प्रकरण : तब्बल 82 दिवसांनंतर मुख्य सुत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – अहमदनगर जिल्हा हादरवून सोडवणा-या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे rekha jare हत्याकांडातील मास्टरमाइंड बाळ जगन्नाथ बोठे याला तब्बल 82 दिवसांनी अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. हैदराबादमधील बिलालनगर भागात बोठे हा वेशांतर करून लपला होता. आज सायंकाळपर्यंत नगरमध्ये आणल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
आरोपी बाळ बोठे हा हैदराबादमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हैदराबाद गाठत 5 दिवस शोधमोहीम राबवून त्याला अटक केली. बोठे ज्या हॉटेलमध्ये लपला होता, त्या खोलीला बाहेरून कुलूप होते. उस्मानिया विद्यापीठातील अॅड. जनार्दन चंद्राप्पा यांनी बोठेला हैदराबादमध्ये आश्रय दिला होता, तर अहमदनगर येथून महेश तनपुरे हा बोठेच्या संपर्कात होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 5 दिवस बिलालनगर परिसरात बोठेचा शोध घेतला. यापूर्वी 3 वेळा पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी झाला होता. मात्र, यावेळी मुबंई व हैदराबाद पोलिसांच्या मदतीने अहमदनगर पोलिसांनी बोठेला अटक केली आहे.
बदलीनंतर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘क्राइम ब्रँचच्या सेवेतून मुक्त झालो’
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक
MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’
21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा
PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
Comments are closed.