IMPIMP

काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रिपद?

by pranjalishirish
MVA Vajramuth Sabha | mahavikas aghadi vajramuth sabha nagpur problems in congress as nitin raut unhappy

नवी दिल्ली : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरून घेरले जात आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये Congress मोठे फेरबदल केले जाणार आहेत. त्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्रिपद मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सुनील केदार ही नेतेमंडळी आज (गुरुवार) रात्री दिल्लीला जाणार आहेत. ही नेतेमंडळी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेट घेणार आहेत. काँग्रेसमध्येही अंतर्गत बदल केले जाणार आहे, असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याच्या चर्चा आहेत. दिल्लीच्या या भेटीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील काँग्रेसचे धोरण, अडचणीत ठरत असलेले मुद्दे, पक्षाअंतर्गत असलेल्या नाराजीवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भेट घेतली होती.

नितीन राऊत यांना विचारणा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारले गेले होते. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला होता. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसकडे असलेल्या काही खात्यांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Also Read :

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts