IMPIMP

Rohit Pawar | ‘खरा इतिहास एकदा सर्वांच्या समोर येऊ द्या’ – आ. रोहित पवार

by nagesh
Rohit Pawar | anil deshmukh should have been released earlier rohit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात वीर सावरकर यांच्यावरुन सुरु असलेल्या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे. राजकीय विषय मला घ्यायचा नाही. पण, खरा इतिहास काय, हा जनतेसमोर आला पाहिजे. पुस्तकात काय आहे, पत्रात काय आहे, हे समोर यायला पाहिजे, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्ये केली, तेव्हा भाजपचे लोक शांत का होते? हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटात इतिहासात बदल करण्यात आला, तेव्हा यांनी तोंडे का उघडली नाहीत, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेवरुन अनेक वाद झाले आहेत.
त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेवरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.
त्यामुळे खरा इतिहास काय आहे, हे एकदा सर्वांच्या समोर येऊ द्या. मला राजकीय विषय काढायचा नाही.
पण, पत्रात काय आहे, पुस्तकात काय आहे, हे सर्वांना कळले पाहिजे, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.

 

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे या वादाला तोंड फुटले. वि. दा. सावरकर (V. D. Savarkar)
यांना 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.
पण, त्यांनी अंदमानातून इंग्रजांना पत्रे लिहून माफी मागितली होती. त्यांनी इंग्रजांचे काम केले.
त्यांना इंग्रज पेन्शन देत होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात अंदमानातून सुटून आल्यानंतर ब्र काढला नाही,
असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या विधानानंतर राज्यात ठिकठिकाणी भाजप आणि मनसेतर्फे
निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी यांच्या पुतळ्याला आणि फोटोला काळे फासणे आणि जोडे मारणे आदी
प्रकार आंदोलनकर्त्यांनी केले आहेत. मनसेने देखील राहुल गांधी यांचा निषेध केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar | real history should come before people says mla rohit pawar over rahul gandhis statement against veer savarkar contraversy

 

हे देखील वाचा :

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

 

Related Posts